मुंबई – शाळेतील शिपायाकडून अल्पवयीन मूलीसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार उघड झाला आहे. तर याप्रकरणात शाळेच्या सीईओने मुलीच्या पालकांना दमदाटी केली आहे. मालाडमध्ये अल्पवयीन मूलीवर अत्याचाराची घटना घडली आहे. शाळेतील शिपायाकडून ५ वर्षांच्या अल्पवयीन मूलीसोबत गैरवर्तन केले आहे, शाळेतील मूलीच्या पालकांवर दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुंबईमध्ये मालाड येथे धक्कादायक घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे. मालाड परिसरातील एका शाळेत ५ वर्षांच्या मूलीशी शाळेतील शिपायाने गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. माहितीनुसार, आरोपी शिपायाने अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्याशी गैरकृत्य केले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांनी तत्काळ शाळा प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र, आरोपीबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यास, शाळा प्रशासनाने टाळाटाळ केली आहे.
तर शाळेच्या बदनामीच्या हेतून उलट शाळेच्या सीईओ यांनी प्रकरण बाहेर न आणण्यासाठी मुलीच्या पालकांवर दमदाटी केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर शाळेचा शिपाई अनिल पांचाळ आणि शाळेचा सीईओ अनंत याज्ञीक यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मालाड पोलिसांनी दोघांवर कलम ७४, ३५१(२ ) बी.एन.एस.२०२३ सह कलम १० ,१७ ,२१ (२) बालकांचे लैगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०२१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर मालाड पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेमुळे मुंबईतील मालाड परिसरातील नागरिकांनी आणि पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. शाळांमधील लहान मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. शाळेसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडल्याने लहान मूलींच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीवर कडक कारवाई करावी, तसेच संबंधित शाळेची मान्यता रद्द करून प्रशासनावरही जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच शाळेतील सीसीटीव्ही फुटेज, कर्मचारी नोंदी आणि प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी केली जात आहे. याप्रकरणात अधिक तपास मालाड पोलिस करत आहेत.





