जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर अहिल्यानगरमध्ये दोन गटांतील वादातून गोळीबार; एका व्यक्ती चा मृत्यू, तर दोन झन जखमी

SHARE:

अहिल्यानगर – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर अहिल्यानगरमध्ये दोन गटांतील वादातून गोळीबार करण्यात आला आहे.निवडणुकांनंतर राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. याप्रकरणात एकाचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात तणावपूर्ण परिस्थिती बनली आहे. अहिल्यानगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर जिल्ह्यातील घोडेगाव परिसरात दोन गटांतील वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, २ जण जखमी झाले आहेत.

या गोळीबाराच्या घटनेनंतर घोडेगाव परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संध्याकाळच्या वेळी घोडश्वरी हॉस्पीटलमध्ये दोन गट आमनेसामने आले होते. आणि दोन्ही गटांमध्ये वाद सुरु झाले, वाद अधिक वाढल्यानंतर दोन्ही गटांकडून गोळीबार करण्यात आला आहे. तर यात नितीन शिरसाट यांचा मृत्यू झाला आहे. सुरज फुलमाळी यांच्यासह आणखी एक जण जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर शिरसाट यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

या गोळीबाराच्या घटनेमूळे रुग्णालय परिसरात काही वेळ मोठा गोंधळ निर्माण झाला होता. नितीन शिरसाट यांच्या मृत्यची घटना घडल्यावर दोन्ही गटांचे समर्थक घोडश्वर रुग्णालय परिसरात जमा झाले. काही वेळ तणाव निर्माण होऊन धक्काबुक्की सुद्धा झाली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. धोकादायक शस्त्रांचा वापर हल्ल्यासाठी केला आहे. अहिल्यानगरमधील घोडेगाव व आसपासच्या भागात यापूर्वीही दोन गटांत संघर्षाच्या घटना घडल्या आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा-श्रीरामपूर भागात वाळू तस्करी, अनेक बेकायदेशर धंदे यामुळे या गुन्हेगारी टोळ्यांमध्ये वारंवार गँगवार सुरु होता. काही गुन्हेगारांना राजकीय मदत मिळत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखणे अहिल्यानगर प्रशासनासमोर आव्हान आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात अलीकडच्या काही दिवसात गून्हेगारी घटना वाढल्या आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा

आजचे राशिभविष्य २३ एप्रिल २०२६: कुठल्या संकटांची आणि सुखाच्या दिवशी मध्ये आपल्याला काही समस्या अनुभवायच्या असतील की सुखाचे दिवस दिसणार? मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी गुरूवार कसा जाणार? राशिभविष्य पूर्णपणे वाचा.