नाशिकमध्ये डॉक्टर तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी घेतल्याचा प्रकार उघडकीस; म्हसरूळ पोलिसांनी सराईत गुन्हेगारासोबत एका महिलेला अटक केली

SHARE:

नाशिक – डॉक्टर तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक मधील म्हसरूळ पोलीस ठाण्यात सराईत गुन्हेगार कुंदन परदेशी आणि मानसी वाळके या महिलेविरोधात खंडणी व जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका गुन्हेगाराला जेलमधून बाहेर काढण्यासाठी, नाशिक मधील एका महिलेने डॉक्टर तरूणीची भयानक फसवणुक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. नाशिकमधील महिला डॉक्टरकडून लाखो रूपयांची खंडणी घेतली आहे. नाशिकमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात काही महिन्यांपूर्वी अटक केलेला सराईत गुन्हेगार कुंदन सुरेश परदेशी याला जामिनावर सोडवण्यासाठी, मानसी अनामिक वाळके या महिलेने समोर राहणाऱ्या नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर तरुणीकडून, ४ लाख ९७ हजार रुपयांची खंडणी घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पैसे परत मागितल्यावर त्या डॉक्टर तरूणीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, व दहशत निर्माण केली आहे. या प्रकरणात नाशिकमधील म्हसरूळ पोलीस ठाण्यात कुंदन परदेशी व मानसी वाळके यांच्याविरोधात, खंडणी व जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमधील ही डॉक्टर तरुणी दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील रहिवासी आहे. सध्या नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात काम करत आहे. काही काळापूर्वी ती मखलमाबाद शिवारातील माळी मंगल कार्यालयाजवळील शतायू कारवा सोसायटीत राहत होती. याच इमारतीसमोर मानसी वाळके राहत असल्याने दोघींमध्ये ओळख निर्माण झाली होती. मानसी वाळके या महिलेने या डॉक्टर तरूणीला विविध कारणे सांगत आर्थिक मदतीची मागणी करत होती. ऑक्टोबर २०२४ ते १९ फेब्रुवारी २०२५ या काळात मानसी वाळके या महिलेने, सुरुवातीला या डॉक्टर तरूणीशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. डॉक्टर तरुणीचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर विविध कारणे, अडचणी सांगत आर्थिक मदतीची मागणी सुरू केली. कुंदन परदेशी हा खून, मारामारी आणि दहशत माजवण्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अटकेत असल्याचे सांगत, त्याला जामिनावर सोडवण्यासाठी पैशांची गरज असल्याचे मानसी वाळके या महिलेने वारंवार सांगितले होते. या कारणावरून डॉक्टर तरुणीकडून टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम उकळण्यात आली. माहितीनुसार, २ लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, २ लाख २७ हजार ५८० रुपये रोख रक्कम, एकूण ४ लाख ९७ हजार ५८० रुपयांची खंडणी त्या डॉक्टर तरूणीकडून उकळण्यात आली आहे. यात सोन्याची चेन, कानातील दागिने, अंगठी आणि मंगळसूत्र यांचा समावेश आहे. मानसी वाळके या महिलेने डॉक्टर तरुणीला नेट बँकिंगद्वारे कर्ज काढण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. याशिवाय बजाज फायनान्सकडून कर्ज घेण्यासही तिला प्रवृत्त करण्यात आले आहे.

तक्रारीत या डॉक्टर तरूणीने सर्व नमूद केले आहे. काही दिवसांनी डॉक्टर तरूणीनी पैसे परत मागितल्यावर तिला मानसी वाळके या महिलेने जीवे मारण्याची धमकी दिली आहे, तुला बघुन घेऊ अशी धमकी दिली आहे. व पोलिसांत तक्रार करू नये म्हणून दबाव टाकण्यात आला. मानसी वाळके या महिलेच्या सततच्या धमक्या, मानसिक त्रास आणि आर्थिक फसवणुकीला कंटाळून संबंधित डॉक्टर तरुणीने, नाशिकमधील म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या गंगापूर पोलिसांच्या ताब्यात असलेला कुंदन परदेशी आणि मानसी मानसी वाळके या दोघांना, लवकरच म्हसरूळ पोलीस अटक करणार आहे, असे म्हसरूळ पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणात अधिक तपास नाशिक पोलीस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा