वाशिम – राज्यात बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आयोग स्थापन होणार आहे व समाजाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. राज्यातील बंजारा समाजाला लवकरच न्याय मिळणार आहे, राज्यातील बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आयोग स्थापन करण्यात येणार आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे. बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाकडूने आयोग स्थापन केला जाणार आहे, व लवकरच राज्यातील बंजारा समाजाला न्याय मिळेल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आयोजित संत सेवालाल महाराज जयंती महोत्सवात ते बोलत होते.
यावेळी त्यांनी संत सेवालाल महाराज व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतींना अभिवादन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद घटनेमुळे कार्यक्रम साधेपणाने घेतला आहे. देशभरातून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या बंजारा समाजाचे स्वागत केले. व समाजाची एकजूट हीच खरी ताकद असल्याचे उपमुख्यमंत्री यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते बंजारा समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पोहरादेवी ही संत सेवालाल महाराजांची भूमी आहे. येथे आल्यावर बंजारा समाजाच्या लोकांना वेगळी प्रेरणा मिळते.
हा संपूर्ण परिसर मोठे पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार आहे. या विकास आराखड्यास ७२४ कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. तर वाशिम मधील सेवालाल महाराज स्मारकासह सर्व कामे वेगाने पूर्ण होणार आहेत, असे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. सेवालाल महाराज विरासत संग्रहालय व सेवालाल स्मारक हे भविष्यात समाजाला व कार्यकर्त्यांना सतत प्रेरणा देणार आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले आहेत. राज्यातील बंजारा समाज हा निसर्गपूजक, मातीशी इमान राखणारा आणि राष्ट्रभक्त समाज आहे. इतिहासात बंजारा समाजाने देशासाठी बलिदान दिले आहे, असे उपमूख्यमंत्री म्हणाले आहेत.
अन्यायाविरुद्ध उभा राहणारा आणि एकजुटीने लढणारा समाज म्हणून बंजारा समाजाची ओळख आहे. बंजारा समाजाचा उल्लेख मानवसमता व अहिंसेचा संदेश या परंपरेत आहे. बंजारा समाजाने शिक्षण घ्यावे, एकत्र राहावे व आपली संस्कृती जपावी, असे आवाहन उपमूख्यमंत्री यांनी केले आहे. राज्यातील बंजारा समाजासाठी उद्योगनिर्मिती व रोजगारासाठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी केली जाणार आहे, तर मुंबईत बंजारा समाज भवनासाठी जागा देण्यात येणार आहे.
बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आयोग स्थापन झाल्याने लवकरच सकारात्मक मार्ग निघेल व समाजाला न्याय मिळेल, असे उपमूख्यमंत्री म्हणाले आहेत. या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्याचे पालक मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार संजय देशमुख, उपस्थित होते. आता राज्यातील बंजारा समाजासाठी आरक्षणासाठी व न्याय मिळण्यासाठी बंजारा आयोग स्थापन केला जाणार आहे, असे उपमूख्यमंत्री यांनी म्हटले आहे.





