गडचिरोली – कोरची मध्ये अल्पवयीन मूलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे, याप्रकरणात आरोपींवर पोक्सो कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गडचिरोलीत एका अल्पवयीन मूलीवर अत्याचाराची घटना घडली आहे. या मुलीच्या मामीला ५ दिवसानंतर हि घटना लक्षात आली आहे. तेव्हा मुलीने घडलेला प्रकार सांगितला आहे. गडचिरोलीमध्ये रंग खेळत असताना एका अल्पवयीन मूलीला घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गडचिरोली जिल्ह्यात कोरची तालुक्यातून ही घटना समार समोर आली आहे. ५ दिवसांनी ही घटना समोर आली आहे. आरोपी मोनूकुमार ढेक याला पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित मुलगी अनाथ आहे. मामा-मामी तिचा सांभाळ करतात. आरोपीने मुलीला फसवून स्वतःच्या घरात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला आहे. मुलीच्या मामीला ५ दिवसानंतर हि बाब लक्षात आली आहे. तेव्हा मुलीने तिच्यासोबत घडले प्रकार सांगितला आहे. त्या मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर, गडचिराली पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे. रंग खेळत असताना एका ८ वर्षीय अल्पवयीन मूलीला घरात नेऊन तिच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात घडला आहे. ही घटना ५ दिवसांनी समोर आली आहे.
गडचिरोलीतील कोरची पोलिसांकडून आरोपी मोनुकुमार ढेक वय २२ या आरोपीला रविवार,८ मार्च २०२६ रोजी अटक करण्यात आली आहे. पीडित अल्पवयीन मूलगी अनाथ असून, तिचा सांभाळ तिचे मामा-मामी करत आहेत. गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना, आरोपीने या अल्पवयीन मूलीला फसवून लावून स्वतःच्या घरात नेले होते. रक्ताच्या नात्यातील असलेल्या या २२ वर्षीय तरुणाने तिथे तिचा फायदा घेत, तिच्यावर अत्याचार केला आहे. एवढेच नाही, तर हा प्रकार कोणाला सांगितला, तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला आहे.
ही घटना घडल्यानंतर 5 दिवसांनी, म्हणजेच रविवार, ८ मार्च रोजी, मामी मुलीला अंघोळ घालत असताना तिच्या पोटावर सूज दिसून आली. मामीने विचारपूस केली असता, अल्पवयीन मूलीने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला आहे. हे ऐकताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर, आरोपी विरोधात कोरची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोरची पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीलो वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तर या आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच, कोरची पोलिसांनी वेगाने हालचाली केल्या आहेत.
या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आरोपीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ मार्च २०२६ रोजी पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. केले, ९ मार्चा रोजी न्यायालयात हजर केले असता, या आरोपीला ३ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांनी दिली आहे, तर या प्रकरणात अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश पवार करत आहेत.





