मुली व विवाहित महिला बेपत्ता होण्याचा प्रकार वाढला; गेल्या वर्षी दीड हजारांच्यावर मुली व महिला बेपत्ता

SHARE:

बुलढाणा – जिल्ह्यात मुली व विवाहित महिला बेपत्ता होण्याचा प्रकार वाढला आहे, तर गेल्या वर्षी जिल्ह्यातून दीड हजारांच्यावर व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत. गेल्या २४ तासात बुलढाणा जिल्ह्यातून पुन्हा एका विवाहितेसह सहा मुली, एक युवक बेपत्ता झाला आहे. पोलीस विभागाकडून प्रेस नोट काढल्या जातात. परंतु आजही जिल्ह्यात बेपत्ता होणारांचे वाढत चालले आहे. गेल्या वर्षी जवळपास बुलढाणा जिल्ह्यातून दीड हजारांच्या वर व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या, त्यात १००० च्या वरती महिला होत्या.

बुलढाणा जिल्ह्यात मुली व विवाहित महिला बेपत्ता होण्याचा प्रकार हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. काल बुलढाणा जिल्ह्यातून ६  महिला बेपत्ता व एक युवक बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर पोलीस विभागाकडून प्रेस नोट काढल्या जातात. गेल्या वर्षी बेपत्ता झालेल्या महिलांपैकी ८७  टक्के महिला पोलिसांनी शोधून काढल्याचे संगितले आहे. मात्र प्रेस नोटमध्ये कुठलीही माहिती देण्यात आली नाही.

बुलढाणा जिल्ह्यातून सरासरी दररोज ५ ते ६ मुली किंवा विवाहित महिला बेपत्ता होत आहेत. काल गेल्या २४ तासात बुलढाणा जिल्ह्यातून एका विवाहितेसह ६  मुली व एक युवक बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र यावर बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाकडून कुठली ही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. असे धक्कादायक चित्र सध्या बुलढाणा जिल्ह्यात दिसत आहे. यावर मात्र पोलीस, सामाजिक संस्था किंवा महिला आयोग काहीही बोलण्यास तयार नाही.

बुलढाणा जिल्ह्यातून अल्पवयीन मुलींसह महिला व सज्ञान मुली बेपत्ता होण्याचा प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यातील 6 मुलींसह एक युवक बेपत्ता झाला आहे. तर १  जानेवारी ते १० मार्च २०२६ पर्यंत जिल्ह्यातील २८९ जण बेपत्ता झाले आहेत. त्यात २०० च्या वर महिला बेपत्ता झालेल्या आहेत.

बेपत्ता झालेल्या महिला व मुलींचे प्रमाण वाढले असल्याने सर्वसामान्य पालकांमध्ये चिंतेचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बेपत्ता झालेल्या मुलींचे किंवा महिलांचे नंतर काय होते? याबाबत कुठलीही माहिती समोर येत नाही. बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस बोलण्यास तयार नाहीत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये विविध कारणांनी महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा