पुण्यामध्ये मैत्रिणींच्या मानसिक त्रासाला कंटाळून नर्सिंग विद्यार्थीनीची आत्महत्या, ३ मैत्रिणींविरोधात गु्न्हा दाखल

SHARE:

पुणे – चंदननगर मधे मैत्रिणींच्या मानसिक त्रासाला कंटाळून नर्सिंग विद्यार्थीनीने आत्महत्या केली आहे, तर याप्रकरणात ३  मैत्रिणींविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातून ही घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीने तिच्या मैत्रिणींच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पायल किशोर राजगुरू असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ही घटना पुण्यातील चंदननगर परिसरात घडली आहे.

या घटनेमुळे पायलच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. चंदननगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुणे पोलिसांना तपासात मृत पायलकडे सुसाईड नोट मिळाली आहे. पायलने तिचे रुममेट आणि मैत्रिणींवर गंभीर आरोप केल्याची माहिती ही सुसाईड नोटमध्ये मिळाली आहे. तिच्या मैत्रिणी तिला सतत मानसिक त्रास देत होत्या, असे पायलने सुसाईड नोटमध्ये लिहिल्याची माहिती मिळाली आहे. मृत पायलने सुसाईड नोटमध्ये आरोप केले आहेत की, तिच्या मैत्रिणी खूप दिवसांपासून तिला मानसिक त्रास देत होत्या.

बदनामी केल्याचा आरोपही तिने केला आहे. तसेच आई-वडिलांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप पायलने केला आहे. या धमक्या आणि रोजच्या मानसिक त्रासाला कंटाळून पायलने आत्महत्या केली आहे.
तर सुसाईड नोट आणि कुटुंबियांच्या जबाबाच्या आधारावर तपास सूरू आहे.

पुण्यातील चंदननगर पोलिसांकडून पायलच्या तीन मैत्रिणींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सबुरी संतोष काळे, शिवानी शाम आजबले, दिपाली अशी आरोपी तरुणींची नावे आहेत. याप्रकरणात अधिक तपास पुणे पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा