पिंपरी चिंचवड – डंपरने १४ वर्षाच्या शाळकरी विद्यार्थ्याला चिरडले आहे, या प्रकरणात वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून पिंपरी चिंचवड पोलिसांनी ट्रक चालकाला अटक करून आणि ट्रकला ताब्यात घेतला आहे. पिंपरी चिंचवड शहरात आकुर्डीवरून चिंचवडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरती एका १४ वर्षाच्या शाळकरी मुलाला डंपरने चिरडले आहे.
या घटनेत शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला असून या अपघातात फारुक शकील तांबोळी या नववीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे, या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर या अपघाताबाबत माहिती देताना पोलिस निरीक्षक दत्ता चासकर यांनी सांगितले की, प्रेम लोक पार्क जवळून खंडोबा माळी परिसरात चाफेकर चौकाकडे एक आरएमसी ट्रक अर्थात डंपर चालला होता, त्यावेळी सायकलवरून जाणारा मुलगा फारुक शकील तांबोळी असे त्याचे नाव आहे.
तो सायकलवरती चालला होता. पाठीमागून ट्रकने धडक दिली. मुलाला वायसीएम हॉस्पीटलमध्ये दाखल केले आहे. डंपर चालकाला अटक केले आहे. त्याचा तपास सुरू आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलाचे नाव फारुक शकील तांबोळी असे आहे. तो इयत्ता नववीमध्ये आहे. अशा डंपरला शहरात येण्यासाठी काही काळ ठरवून दिलेला आहे. १२ वाजल्यानंतर जड वाहनांना प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. हा अपघात साडेबारा वाजण्याच्या आसपास घडला आहे, त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहोत, अशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी माहिती दिली आहे.





