पुणे – गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, तर पुण्यात भर रस्त्यावर १९ वर्षांच्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. पुण्यात भर रस्त्यावर १९ वर्षांच्या तरुणाला कोयत्याने वार करून मारण्यात आले आहे. एका तरूणाची हत्या करून हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मारामारी, खून अशा प्रकारच्या घटना पुण्यात वाढत आहेत.
छोट्या मोठ्या टोळ्यांमध्ये वारंवार हल्ले होत आहेत. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात 3 तरुणांनी मिळून एका तरुणाला भर रस्त्यावर कोयत्याने वार करून हत्या केली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, पुण्यातील सिंहगड रोड परिसरात ही घटना घडली आहे. सिंहगड रोड पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. करण गिरीश काशीद असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. करण हा सिंहगड परिसरातच राहणार होता.
रस्त्यावरून जात असताना 3 तरुणांनी करण काशीदला अडवले आणि कोयत्याने वार केले आहेत. भर रस्त्यावर कोयत्याने वार करून करण काशीदची हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. करण काशीदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. जुन्या वादातून कऱण काशीदची हत्या करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन गँगमधील जुन्या वादातून ही घटना घडली असल्याचची माहिती मिळाली आहे.
सिंहगड पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. पुणे शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथक गेले असल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणात अधिक तपास पुणे पोलिस करत आहेत.





