आज बुधवार, दि. १८ मार्च २०२६ ! श्री गणेशाची कृपा कोणावर होणार, वाचा आजचे राशीभविष्य…

SHARE:

राशीभविष्य – आज १८ मार्च २०२६, आजचा वार बुधवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आज दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीगणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

मेष रास (Aries)
करिअरमध्ये रखडलेली कामे उजेडात येऊन त्याची लवकर कारवाई कराल तरुण वर्ग आपला जोडीदार निवडण्यात यशस्वी होईल.

वृषभ रास (Taurus)
विद्यार्थी आवडत्या क्षेत्रात रमतील महिलांचा खरेदीचा मूड राहील.

मिथुन रास (Gemini)
घरातील शांतता टिकवण्यासाठी तुम्हाला मध्यस्ताची भूमिका करावी लागेल अशा वेळी भावना बाजूला ठेवून कर्तव्याला प्राधान्य द्यावे लागेल.

कर्क रास (Cancer)
जिथे जाल तिथे कष्ट आणि त्रासाचा सामना करावा लागेल सरकारी नोकरीत असणाऱ्यांना याचा जास्त अनुभव येईल.

सिंह रास (Leo)
ज्यांचा स्वतंत्र धंदा आहे त्यांनी संयम पाळावा आरोग्याच्या दृष्टीने जुन्या रेंगाळणाऱ्या व्याधींना तोंड द्यावे लागेल.

कन्या रास (Virgo)
निग्रहाने एखाद्या कामाची पूर्ती करा यश मिळेल आणि काम करणे सोपे जाईल.

तूळ रास (Libra)
स्वभावा मध्ये निश्चयपणा बाणवा तुमच्यातील चांगल्या गुणांचा आढावा घेऊन काम करणे महत्त्वाचे ठरेल.

वृश्चिक रास (Scorpio)
प्रत्येक कामामध्ये नियमितपणा ठेवा नकारात्मक विचारांना जागा देऊ नका म्हणजे तुमच्या दृष्टिकोन सुधारेल.

धनु रास (Sagittarius)
महिलांना इतरांवर विश्वास ठेवावा लागेल घरामध्ये काही सुधारणा किंवा नवीन खरेदी यांचा विचार कराल.

मकर रास (Capricorn)
बराच पैसा खर्च करावा लागेल घरातील दोन पिढीच्या विचारातील तफावत तुम्हाला बरीच अस्वस्थ करून जाईल.

कुंभ रास (Aquarius)
आज भावनांचा कोडमारा सहन करावा लागेल जुन्या विचारांना चिटकून बसल्यामुळे युवा पिढीशी मतभेद होतील.

मीन रास (Pisces)
युक्ती आणि बुद्धी यांचा योग्य वापर आज आवश्यक ठरेल कारण नसताना अस्वस्थ होणे आणि काळजी करणे यामुळे आत्मविश्वास कमी होईल.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल रयत रक्षक न्यूज कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Leave a Comment

अधिक वाचा