परीक्षा केंद्रात घुसून दहावीच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला, आरोपीसह आणखी ४ जणांना अटक; शाळा प्रशासनाला याची माहिती नसल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे

SHARE:

पुणे – जिल्ह्यात परीक्षा केंद्रात घुसून दहावीच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींसह आणखी ४ जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील ओतुरमध्ये दहावीची परिक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील ओतूरमध्ये परीक्षा केंद्रात ४ जण परीक्षा केंद्रात आले आणि विद्यार्थ्यावर हल्ला केला आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे.

पुणे जिल्ह्याच्या ओतूर येथील श्री संत गाडगे महाराज विद्यालयातील दहावीच्या परीक्षा केंद्रात सोमवारी हा प्रकार घडला आहे. विद्यार्थ्याने मानेवरील वार हातावर झेलल्याने मोठी दुर्घटना टळली आहे, मात्र तो दहावीचा विद्यार्थी जखमी झाला आहे. ओतूर पोलिसांनी आरोपीसह आणखी ४ जणांना अटक केले आहे. हल्ल्यात वापरलेला कोयता जप्त करण्यात आला आहे. या घटनेत मुख्याध्यापकांनी माहिती देताना सांगितले की, एका मुलाच्या हातावर वार केले होते, तिथे मोठा गोंधळ झाला होता, आम्ही सगळे गेलो तिथली परिस्थिती हाताळली आहे.

आरोपी अकरावीमध्ये शिकतो, त्याला पोलिस स्टेशनला नेले आहे. ज्या मुलाच्या हातावरती वार झाले त्याच्यावरती औषध उपचार केले आहेत, त्यानंतर त्याला रायटर दिला त्या मुलाने दहावीची परिक्षा दिली आहे. ४ जण इथे आले होते, त्यांची आधीही भांडण झाली असल्याची चर्चा आहे. एकूण १३ शाळेचे हे दहावीचे परिक्षा केंद्र आहे, रोज पोलिस आणि २ आरोग्य केंद्राचे अधिकारी असतात, अशी माहिती मुख्याध्यापकांनी दिली आहे. तर जखमी झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांने दिलेल्या माहितीनुसार, ६ तारखेला देखील त्या मुलांनी त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.

तर ६ तारखेला माझ्या माहितीप्रमाणे असा काही प्रकार घडला नाही, असे मुख्याध्यापकांनी म्हटले आहे. तो मुलगा सांगत असला तरी देखील आमच्या सीसीटीव्हीमध्ये असे काही दिसत नाही, जर तसे काही घडले तर पालकांनी आम्हाला ती माहिती द्यायला हवी होती. आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती नाही, असे मुख्यध्यापकांनी म्हटले आहे. ही घटना घडली, त्यावेळी त्या वर्गामध्ये कोणताही शिक्षक किंवा कर्मचारी नव्हता.

ओतूर हे सर्वात मोठे दहावीचे परिक्षा सेंटर आहे, आम्ही बेल वाजल्यानंतर मुलांना गेटमधून आत घेतले जाते, त्यांचे हॉल तिकीट त्यांच्या वर्गातच चेक केले जाते. अशा घटना रोखण्यासाठी आम्ही योग्य त्या उपाययोजना करू. दहावीच्या परिक्षाचे सेंटर मोठे असल्यामुळे दहावीची खूप मुले परिक्षा देण्यासाठी ग्रामीण भागातून येतात. आता यापुढे गेटवरतीच आम्ही दहावीच्या परिक्षेचे हॉल तिकीट चेक करूनच, मुलांना आतमध्ये सोडले जाईल असे शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा