ड्रग्ज माफियांचे कंबरडे मोडले! ८० कोटींचा मुद्देमाल जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

SHARE:

मुंबई – पोलिसांकडून अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे, तर ड्रग्ज फॅक्टरीवर कारवाई करून 80 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. गुजरातमधील एका फॅक्टरीवर मुंबई पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. मुंबईतील साकीनाका पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील मोठी कारवाई करत 80 कोटी किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत.

राज्यात पिंपरी चिंचवडमधील विषारी दारुप्रकरणात 24 जणांचा बळी गेल्याने राज्यात गेल्या काही दिवसांत अवैध धंद्यांविरुद्ध पोलिस राज्यभर कडक कारवाई करत आहे. त्यामध्ये, अवैध दारुसह, ड्रग्ज प्रकरणातही पोलिसांकडून धाड टाकून कारवाई केली जात आहे. त्यातच, गुजरात राज्यामध्ये ड्रग्ज फॅक्टरीवर कारवाई करून 80 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहेत.

तर, मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी ड्रग्स विरोधात ही मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी, अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणात अमली पदार्थांच्या अवैध तस्करीशी संबंधित काही आरोपींवर कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचा स्रोत, पुरवठा साखळी आणि आंतरराज्यीय अथवा आंतरराष्ट्रीय रॅकेटशी असलेले संबंध तपासण्यासाठी साकीनाका पोलीस चौकशी करत आहेत. या ड्रग्स फॅक्टरी कारवाईमध्ये आणखी अटक आणि मोठे खुलासे होण्याची शक्यता मुंबई पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मुंबई पोलिस करत आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment