सोलापूर – शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱी संघटनेने आंदोलन केले आहे, तर द्राक्षबागा व फळपिके उध्वस्त करून महामार्ग केला तर विरोध करणार असे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर शेतकरी संघटनांच्या वतीने सांगण्यात आले आहे. तर शेतकऱी संघटनांनी राज्य सरकारला इशारा,दिला आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन झाले. राज्यात प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यात मोठे शेतकऱी करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि पंढरपूर तालुक्यात या शक्तीपीठ महामार्गाविरोधात जोरदार शेतकरी आंदोलन झाले. माढा तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱी बांधवांनी मोठा मोर्चा काढला. तर पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना शेतकऱी बांधवांनी विरोध केला आहे. राज्यातील शेतकऱी बांधवांच्या विरोधाला न जुमानता बळाचा वापर करून जर शक्तीपीठ महामार्ग शेतकर्यांवर लादण्याचा प्रयत्न केला, तर मुख्यमंत्री फडणवीस यांना पंढरपुरात पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा शेतकरी संघटनांच्या राजकीय नेत्यांनी दिला आहे.
माढा येथील स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर शेतकरी संघटनांच्या वतीने माढा तहसील कार्यालयावर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेतकरी नेते संजय पाटील यांनी राज्यसरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. शेतकरी बांधवांच्या द्राक्षबागा आणि फळपिके उध्वस्त करून जर शक्तीपीठ महामार्ग केला तर त्याला विरोध केला जाईल, असा इशारा शेतकरी संघटनाचे नेते संजय पाटील यांनी दिला आहे.
तसेच, मुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये पाय ठेवू न देण्याचा इशारा शेतकरी संघटनाचे नेते संजय पाटील यांनी दिला आहे. पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे शक्तीपीठ महामार्गाच्या भू-संपादनासाठी मोजणी करण्यासाठी सरकारी अधिकारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त दाखल झाला होता. मात्र, मोजणीची कुणकुण लागताच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. शेतकऱी बांधवांनी सरकारी अधिकारी आणि पोलीस फौजफाट्याला विरोध करत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
शेतकऱी बांधवांचा वाढता रोष पाहून शासकीय अधिकाऱी मोजणी न करताच माघारी गेले आहेत. यापूर्वी, नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रातून मोठा विरोध झघला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या महामार्गाचा मार्ग बदलण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही ज्या गावांमधून हा मार्ग जात आहे, तिथे शासन आणि प्रशासनाला शेतकऱी बांधव विरोध करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.





