धर्माचा बुरखा अन् अंमली पदार्थांचा वापर; तरुणींचे शोषण करणाऱ्या ‘आयआयटीयन बाबा’चा पर्दाफाश

SHARE:

उत्तर प्रदेश – गीतेचे ज्ञान आणि ऑनलाइन प्रवचने देण्याच्या नावाखाली अंमली पदार्थ देऊन अनेक तरुणींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आयआयटीयन ढोंगी बाबा अभिषेक मिश्रा याला मथूरा येथून अटक करण्यात आली आहे. आरोपी ढोंगी साधू अभिषेक मिश्रा याने आयआयटी रुरकीमधून बी.टेक पदवी घेतली आहे. तो साधू असल्याचे भासवून गोवर्धनच्या राधाकुंड परिसरात हे कृत्य करत होता. छत्तीसगडमधील एका तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याच्या तावडीतून इतर दोन तरुणींची सुटका करून त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.

पोलिसांच्या तपासात असे उघड झाले आहे की, आरोपीचे खरे नाव अभिषेक मिश्रा उर्फ ​​आदिकर्ता नारायण दास असून तो मूळचा ओडिशाच्या फोर्डा येथील आहे आणि त्याचे आई-वडील भुवनेश्वर येथे राहतात. आरोपी अभिषेक मिश्रा गेल्या काही वर्षांपासून गोवर्धनच्या राधाकुंड परिसरात राहत होता. तो ऑनलाइन गीता प्रवचन देऊन आणि आध्यात्मिक सत्रांच्या माध्यमातून तरुण-तरुणींना आपल्या जाळ्यात ओढत होता. या दरम्यान ढोंगी अभिषेक मिश्रा याने मथूरा येथील आश्रमात राहणार्या तरुणींना अंमली पदार्थ देऊन त्यांचे लैंगिक शोषणही केले.

मथूरेत इंटरशीप करत असलेल्या छत्तीसगडमधील एका विद्यार्थिनीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. एका महिलेने आरोप केला की ती तिच्या बहिणीला भेटायला मथुरेत आली होती, जिथे आरोपीने तिला प्रसाद असल्याचे सांगून दूध दिले. पीडितेच्या म्हणण्यानुसार, दूध प्यायल्यानंतर तिची
प्रकृती खालावली आणि दुसर्या दिवशी आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. विरोध केल्यावर ढोंगी जंताने तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोपही महिलेने अभिषेक मिश्रा याच्यावर केला आहे.

या प्रकरणी महिलेने आणि पीडिताने पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवला आणि तपास सुरू केला. त्यानंतर आरोपीला आरोपी ढोंगी जंत अभिषेक मिश्रा याला राधाकुंड येथील त्याच्या लपण्याच्या ठिकाणाहून अटक करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन तरुणींनाही ताब्यात घेतले असून, त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, महिलांची मानसिक स्थिती आणि प्रकरणाच्या इतर पैलूंची चैकशी केली जात आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, महिलांना गुंगीचे औषध देणे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे आणि त्यांना धमक्या देणे या आरोपांप्रकरणी आरोपीची चैकशी केली जात आहे. अधिकार्यांनी सांगितले की प्रकरणाच्या इतर संभाव्य पैलूंची आणि इतरांच्या भूमिकेचीही चैकशी केली जात आहे. आरोपीची सध्या चैकशी सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, येथे अनेक मुली होत्या, पंरतू त्या या ढोंबी बाबाविरोधात तक्रार करण्यास पुढे येत नव्हत्या.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.

Leave a Comment