अवैध दारूभट्टीवर मोठी कारवाई; कारवाईत 16 लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त

SHARE:

पालघर – जिल्ह्यात अवैध दारूभट्टीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 16 लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुण्यातील विषारी दारू दुर्घटनेनंतर राज्यभरातील पोलीस यंत्रणा अवैध दारू व्यवसायाविरोधात कडक कारवाई करत आहे. त्यामुळे वसईच्या नायगाव पोलिसांनी जंगल परिसरातील अवैध गावठी दारूभट्टीवर मोठी कारवाई केली आहे. अवैध गावठी दारूभट्टी जाळून उद्ध्वस्त केली आहे.

या कारवाइमध्ये 16 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून घटनास्थळीच नष्ट करण्यात आला आहे. पुण्यातील विषारी दारू दुर्घटनेत मृतांचा आकडा 26 वर पोहोचला आहे. राज्यभरात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेनंतर अवैध दारू निर्मिती व विक्री करणार्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नायगाव पोलिसांनी जंगल परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी दारू निर्मिती केंद्रावर धाड टाकली आहे. पोलिसांकडून कडक कारवाई झाली आहे.

नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाला जंगलात अवैध दारूभट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जंगल परिसरात शोधमोहीम राबवली आहे, आणि धाड टाकली आहे. या कारवाईत 2,800 लिटर तयार गावठी दारू, 3,240 लिटर गुळाचा साठा, तसेच दारू निर्मिती आणि साठवणुकीसाठी वापरण्यात येणारे मोठे ड्रम, आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची एकूण किंमत 16 लाख 27 हजार रुपये इतकी आहे.

पोलिसांनी हा संपूर्ण बेकायदेशीर साठा जागेवरच नष्ट केला आहे. पुण्यातील विषारी दारू दुर्घटनेमुळे अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा प्रकारच्या घटना वसईसह इतर भागांत घडू नयेत यासाठी नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी अवैध दारूभट्टी विरोधात विशेष मोहीम राबवून कडक कारवाई केली आहे.

पोलिसांच्या या कारवाईमुळे दारू माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन अवैध दारू निर्मिती व विक्री करणार्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.

Leave a Comment