अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करणे ठरले महागात; मिरवणुकीवर दगडफेक आणि चिमुकलीवर ॲसिड हल्ला

SHARE:

जालना – संपूर्ण राज्यात 31 मे 2026 रोजी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. मात्र या दरम्यान राज्यात काही ठिकाणी समाजकंटकांनी मिरवणूकीवर दगडफेक केल्याची आणि मारहाण केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. इतकेच नाही तर जालना जिल्हयात एका चिमकल्या बालीकेवर ॲसीड फेकल्याची धक्कादायक घटना देखील घडली आहे. ज्यामध्ये मुलगी भाजली असून तिला गंभीर दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हयाच्या भोकरदन तालुक्यतील गोद्री गावात गत रविवारी लोकमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी केली जात होती. मात्र त्यांना हे आवडले नाही. अहिल्याबाईची जयंती का साजरी केली जात आहे, हा राग मनात ठेवून काही समाजकंटकांनी गावात धडक दिली. त्यांनी घरात बळजबरीने प्रवेश करून महिला आणि पुरूषांना बेधम मारहाण केली. असा आरोप स्थानिकांनी केला.

समाजकंटक एवढ्यावरच थांबले नाहीत तर तयांनी जयंतीच्या रागातून एका लहान मुलीवर ॲसीड फेकले.ज्यामुळे ती गंभीरपणे भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिमुकल्या बालीकेवर ॲसीड फेकल्यामुळे गावात संतापाची लाट उसळली असून या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाकडून तपास आणि कारवाई सुरू आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

एका अन्य घटनेत यवतमाळ जिल्हयातील उमरखेड तालुक्यातील मुळावा येथेही अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर अज्ञातांनी अंदाधुंद दगडफेक केल्याची घटना घडली. यात सुमारे 15 ते 20 जण जखमी झाले असून, त्यातील काहींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काहींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियूष जगताप आणि उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांनी घटनास्थळी पोहचून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment