मुंबईमध्ये लाच मागितल्या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षकांवर एसीबीची कारवाई; प्रॉपर्टी चा अहवाल बदलण्याच्या बदल्यात मागितली लाच

SHARE:

मुंबई – खार मध्ये लाच मागितल्या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षकांवर एसीबीकडून कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत दीड लाखाची लाच घेताना पोलीस अधिकाऱ्याला अटक केली आहे. मुंबईत एका प्रॉपर्टी प्रकरणात चौकशीचा अहवाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी पोलिस अधिकारी तुषार काळे याने ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी संबंधित तक्रारदाराकडे केली होती. राज्यात गेल्या काही महिन्यापासून लाच प्रकरणात एसीबीकडून कारवाई होत आहे.

राज्यातील महसूल, प्रशासन आणि पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात धाडी टाकत अनेकांना लाच स्वीकारताना एसीबीकडून अटक करण्यात आली आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वी एका पोलीस अधिकाऱ्यास लाच घेताना अटक केली होती. आता, पुन्हा एकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कडक कारवाई केली आहे. मुंबईतील खार पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक तुषार काळे यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे.

या घटनेमुळे मुंबईच्या पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता पुन्हा एकदा राज्यातील पोलीस खात्यातील भ्रष्टाचार समोर आला आहे. मुंबईतील या घटनेत ठरल्याप्रमाणे पोलिस अधिकारी तुषार काळे यास दीड लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने पकडले आहे. मुंबईतील वांद्रे न्यायालयात हे प्रकरण चौकशीसाठी गेले होते. त्याची चौकशी करण्यासाठी खार पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी तुषार काळे याला सांगण्यात आले होते.

मात्र, या प्रकरणी तक्रारदाराच्या बाजुने अहवाल देण्यासाठी या पोलीस अधिकाऱ्याने ३ लाख रूपये लाच मागितली होती. मात्र, तक्रारदार आणि एसीबीच्या सतर्कतेमुळे पोलिस अधिकारी तुषार काळे यांना लाच घेताना अटक केली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा