नाशिकमध्ये जन्मदात्या वडिलांवरच मुलाने चाकूने हल्ला केल्याची घटना; पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल

SHARE:

नाशिक – जन्मदात्या वडिलांवरच मुलाने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे, तर या प्रकरणात पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून मुलाने जन्मदात्या बापावर चाकूने हल्ला केला आहे. दीड महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर वडिलांचा मृत्यू झाला आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात एका कुटुंबातील किरकोळ वाद इतका टोकाला गेला की, एका मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांवरच चाकूने हल्ला केला होता.

दीड महिन्याच्या उपचारानंतर वडिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे नाशिकच्या पंचवटी परिसरात खळबळ उडाली आहे. घरगुती वादातून ही घटना घडली आहे. नाशिक शहरातील पेठ रोडवरील नवनाथनगर, रोकडे चाळ परिसरात सखाराम पंडित भावसार हे आपल्या कुटुंबासह राहत होते. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी त्यांचा मुलगा अश्विन भावसार याच्याशी कौटुंबिक कारणावरून जोरदार वाद झाला होता. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले.

रागाच्या भरात अश्विनने जवळ असलेला चाकू उचलून वडील सखाराम यांच्या पोटाच्या डाव्या बाजूस वार केला होता. हा हल्ला अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता. हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या सखाराम भावसार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांकडून उपचार सुरू होते, आणि गेल्या दीड महिन्यांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते. मात्र उपचार चालु असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला आता अधिकृतपणे खुनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच नाशिक शहरातील पंचवटी पोलीसांकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. संशयित आरोपी अश्विन भावसार याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात नाशिक शहरातील पंचवटी पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून हिंसक घटना घडली आहे. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा