नवी दिल्ली – ‘एआय’ चा वापर वाढल्यामुळे पुढील 5 वर्षांत जगभरातील बँकच्या २ लाख नोकऱ्या कमी होणार आहेत, असे ब्लूमबर्ग संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. बँकेतील नोकरी सर्वात सुरक्षित मानले जात होती. गेल्या काही महिन्यात जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात केली आहे. मात्र आता जगभरातील मोठ्या बँकेतून कर्मचारी कपात होणार असल्याची माहिती मिळाली आहे. एआयचा वापर वाढल्यामुळे एचएसबीसी बँक ही बँकेतून २०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे.
१६१ वर्षे जुन्या असलेल्या बँकेच्या निर्णयाने खळबळ उडाली आहे. एचएसबीसी बँक ही एआयचा वापर वाढवत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीचा विचार करत असल्याची माहिती मिळाली आहे. या निर्णयामुळे एचएसबीसी बँकेतील २० हजार कामगारांची नोकरी जाणार आहे. लंडन मुख्यालय असलेली गुंतवणूक बँक एचएसबीसी येत्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर कर्मचार्यांची संख्या कमी करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
ब्लूमबर्ग संस्थेच्या अहवालानुसार एचएसबीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्जेस एलहेडरी बँकेचे कामकाज अधिक सोपे आणि जलद करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयचा वापर वाढवण्यावर भर देत आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार ग्राहकांशी थेट संबंध नसलेल्या मिडल आणि बॅक-ऑफिसमधील नोकऱ्यांवर याचा सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. मात्र या संदर्भात प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू आहे. या बदलामुळे सुमारे २०,००० नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात, जे बँकेच्या एकूण जागतिक कर्मचाऱ्यांच्या सुमारे १० टक्के आहेत.
मध्य-पूर्वेतील तणाव वाढण्यापूर्वीच या बदलांवर चर्चा सुरू झाली होती. २०२४ मध्ये सीईओ पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जॉर्जेस एलहेडरी यांनी बँकेत मोठे बदल सुरू केले आहेत. यामध्ये हजारो कर्मचाऱ्यांची कपात, काही व्यवसायांची विक्री, विलिनीकरण आणि काही विभाग बंद करण्याचे निर्णय आधीच घेतले गेले आहेत.
२०२५ च्या अखेरीस एचएसबीसी बँकमध्ये २,१०,००० कर्मचारी कार्यरत होते. आता बँक अशा पदांचा पुनर्विचार करत आहे.
जिथे कर्मचारी स्वतः नोकरी सोडतात, ती पदे पुन्हा भरली जावीत का नाही. याशिवाय काही नोकऱ्या व्यवसाय विक्री किंवा बंद करण्यामुळेही कमी होऊ शकतात. जागतिक बँकिंग क्षेत्रात वेगाने एआयचा वापर वाढत असल्याने ही नोकर्यांवर परिणाम होणार आहे. जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे काम करण्याच्या पद्धती आणि कर्मचाऱ्यांची गरज मोठ्या प्रमाणावर बदलत आहे. पुढील ५ वर्षांत जगभरात २ लाख नोकऱ्या कमी होणार आहेत.
ब्लूमबर्ग संस्थेच्या अहवालानुसार पुढील ५ वर्षांत जगभरातील बँका मिळून सुमारे २ लाख नोकऱ्या कमी करणार आहेत. कारण जगभरांत अनेक कामांसाठी आता यांत्रिक मशीन आणि एआयचा तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. व अलीकडच्या काळात एआय तंत्रज्ञानाचा वापर अधिक वाढला आहे. जगभरातील तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या मते ही एकूण जगभरातील बँक कर्मचार्यांच्या संख्येत ३ टक्क्यांची घट होऊ शकते.





