राज्यात अवकाळी पावसाने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात; काढणीला आलेल्या शेतीपिकांचे नुकसान

SHARE:

मुंबई – राज्यात अवकाळी पावसाने शेतकरी वर्ग मात्र मोठ्या संकटात सापडला आहे, तर राज्यात काढणीला आलेल्या शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीमुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यात गेल्या २ दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीतील पिकांवचे नुकसान झाले आहे. राज्यात नागपूरपासून सोलापूर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, परभणी, जालना ते बीडपर्यंत अवकाळी पाऊस पडल्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली आहे.व राज्यातील शेतकरी वर्ग मात्र मोठ्या संकटात सापडला आहे.

नागपूर शहरातील काही भागात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ झाली आहे. हवामान विभागाने पुढील २ दिवस विदर्भ-मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. सोलापूरमध्ये गुरुवारी रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. वीज नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. नाशिकमध्ये ही जोरदार पाऊस पडला आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहर आणि ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला आहे.

या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या कांदा, गहू आणि हरभरा पिकांना मोठा फटका बसला आहे. राज्यातील रब्बी पिकांनाही मोठा फटका बसला आहे. बुलढाणा जिल्ह्यात वादळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर तुनकी परिसरात कांदा आणि गहू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच मेहकर, लोणार आणि चिखली तालुक्यात गारपिट व पावसामुळे केळी, संत्रा, निंबू यांसारख्या फळांच्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे.

राज्यात या अवकाळी पावसामुळे आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यात वादळ वाऱ्यांचा पाऊस झाला आहे. पूर्णा तालुक्यातील धानोरा, काळे, पाथरी तालुक्यातील गुंज भागांतील आंब्यांच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंब्यांची गळती झाली आहे. झाडांवर केवळ फांद्या उरल्या असून गावरान आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक ठिकाणी भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव तालुक्यातही पावसाने हजेरी लावली आहे.काढणीला आलेले गहू, मका, ज्वारी आणि बाजरी ही पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

जालना जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा तसेच फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.बीड जिल्ह्यात गारपीटीनंतर गारांचा खच साचल्याचे चित्र समोर आले आहे. गहू, ज्वारी, आंबा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यशासनाने पंचनामे करून शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी राज्यभरातून शेतकर्यांनी केली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा