मुंबई – आखातातील युध्दामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. तर भारतात पेट्रोलचे दर वाढणार आहेत. भारतात ही पेट्रोल दर वाढले आहे. इराण-इस्रायल युद्धाचा भारताला फटका बसला आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील युध्द आणखी वाढल्याचा परिणाम जागतिक स्तरावरील इंधन दरांवर झाला आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे भारतातील पेट्रोलियम कंपन्यांनी प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज २० मार्च पासून भारतात ही प्रीमियम पेट्रोलसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. भारतात नवे इंधन दर लागु झाले आहेत. भारतातील पेट्रोलियम कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पीड आणि पॉवर यांसारख्या प्रीमियम पेट्रोलच्या दरात बदल झाले आहेत. आता भारतातील इंधन दर वाढले आहेत. भारतात ही स्पीड व पॉवर प्रीमियम पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २.०९ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी या पेट्रोलचा जुना दर १११.६८ रुपये प्रति लिटर होता, तो आता ११३.७७ रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे.
दरवाढीचे मुख्य कारण आहे की, जागतिक पातळीवरील कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील युध्द तीव्र झाल्याने जागतिक तेल उत्पादन व जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या युध्दात आखातातील देशांवरील ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले झाल्यामुळे जागतिक तेल बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर वाढले आहेत. जागतिक स्तरावर इंधन दर वाढल्यामुळे जगभरातील अनेक देशांना इंधन दरवाढीचा फटका बसला आहे.
येणाऱ्या काळात ही इंधन दरवाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक तज्ज्ञांच्या मते, होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळे निर्माण झाल्यास जागतिक तेल पुरवठ्यावर गंभीर परिणाम होणार आहे. कारण जगातील २० टक्के तेल वाहतूक या समुद्री मार्गाने होते. यामुळे जगभरातील भारतासह अनेक देशांमध्ये इंधन दर वाढले आहेत, व आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात जगभरातील सर्वसामान्यांच्या खिशावर याचा परिणाम होण्याची भीती जागतिक तज्ञांनी व्यक्त केली आहे.





