खासगी रुग्णालयाकडून औषधे व उपचाराच्या नावाखाली सर्वसामान्यांची लुट; देशातील सरकारच्या दुर्लक्षामुळे आरोग्य क्षेत्र धोक्यात

SHARE:

नवी दिल्ली – देशात सरकारच्या दुर्लक्षामुळे खासगी रुग्णालयाकडून औषधे उपचाराच्या नावाखाली सर्वसामान्यांची लुट करण्यात आहे. दिल्लीमध्ये रूग्णालयाकडून पेशंटला उपचाराच्या नावाखाली जास्त बिल आकारण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्या रुग्णाची हॉस्पिटलकडे एक मागणी केली होती. सविस्तर औषधे उपचाराचे बिल मागितले आणि दिल्लीतील एका खासगी रूग्णालयातील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दिल्लीमध्ये वैद्यकीय उपचारांनंतर रुग्णालयाकडून येणारे बिल डोळे झाकून भरणाऱ्यांसाठी हे वास्तव आणि डोळे उघडणारी घटना आहे.

दिल्लीमध्ये एका रुग्णाने २०२६ च्या जानेवारी महिन्यात एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. सुरुवातीला विमा वजा जाता या रुग्णाला १ लाख रुपयांचे बिल देण्यात आले होते. मात्र, या रुग्णाने सविस्तर औषधे उपचाराचे बिल मागितले आणि त्या रूग्णालयातील धक्कादायक वास्तव समोर आले.दिल्लीतील खासगी हॉस्पिटलचा उपचारांसाठी जास्त बिल मागितल्याचा हा प्रकार समोर आला आहे. दिल्लीतील रुग्णाने जेव्हा ६ पानांचे तपशीलवार बिल तपासले, तेव्हा त्यात अनेक चुका सापडल्या आहेत.

दिल्लीतील एका रुग्णाला भूलतज्ज्ञ सल्ल्यासाठी ३१,४३० रुपयांचा चार्ज लावला होता, भूलतज्ज्ञ सल्ल्यासाठी जे प्रत्यक्षात कधी झालेच नव्हते. औषधे उपचारांसाठी लागणाऱ्या एका सप्लाय किटचे पैसे २ वेळा बिलामध्ये आकारण्यात आले होते. जेव्हा ही बाब दिल्लीतील खासगी रूग्णालयातील बिलिंग विभागाच्या ध्यानात आणून दिली, तेव्हा २ आठवड्यांत हे अतिशुल्क काढून टाकण्यात आले आहे. आणि दिल्लीतील खासगी रूग्णालयातील बिल १ लाखावरून ५७,००० रुपयांवर आले आहे.

दिल्लीतील एका खासगी रूग्णालयाने औषधे उपचारासाठी जास्त बिल घेतल्याचा प्रकार हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटने विरोधात सोशल मीडियावरून संताप व्यक्त करण्यात आला आहे. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी दिल्लीतील खासगी रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवर व मनमानी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याप्रकरणात दिल्ली सरकारवर ही टीका करण्यात आली आहे. देशातील अनेक युजर्सच्या मते, देशातील काही खासगी रुग्णालये मुद्दाम अशा चुका करत असतात.

कारण त्यांना माहित असते की, लोक औषधे उपचारांचा बिल तपशील तपासणार नाहीत. विमा कंपन्या प्रीमियम वाढवण्यासाठी भांडतात. पण देशातील काही खासगी रुग्णालये जेव्हा तुमची फसवणूक करतात तेव्हा ते गप्प का बसतात?“ असा प्रश्न एका युजरने उपस्थित केला आहे. देशातील सरकारी देखरेखीच्या अभावामुळे देशातील खासगी रुग्णालये ही मनमानी पध्दतीने कारभार करून गोरगरिब व सर्वसामान्य नागरिकांची रूग्णांची लुट करत आहेत, अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

देशात खासगी रूग्णालये औषधे उपचाराच्या नावाखाली सर्रास सर्वसामान्य ना्रगरिकाला रूग्णाला लुटण्याचे काम करत आहेत. त्यामुळे रूग्णाला खासगी दवाखान्यात उपचारासाठी भरती केले, तर बिल भरण्यापूर्वी या बिलात नक्की काय लिहिले आहे, याची तपासणी नक्की करा. फक्त एकूण रकमेची हिशोब न घेता, प्रत्येक गोळी आणि प्रत्येक सुईचा हिशोब असलेले सविस्तर बिल घेण्याची गरज आहे. डॉक्टरांनी सांगितलेले उपचार आणि बिलात लावलेले चार्जेस याची तुलना करण्याची गरज आहे, व बिल तपासण्याची गरज आहे.

बिलात एखादी गोष्ट समजली नाही, या प्रकरणात खासगी रूग्णालयातील बिलिंग विभागाला ही विचारणा करण्याची गरज आहे. सविस्तर औषधे उपचाराचे बिल मागितल्यामुळे अनेकदा बिलात १५ ते २० टक्क्यांची कपात होते. कारण आज देशभरातील खासगी रूग्णलयाकडून औषधे उपचाराच्या नावाखाली ही अनेक अनावश्यक चार्जेस लावले जातात.

देशातील खासगी रूग्णलयात आजही सर्वसामान्य नागरिकांचे औषधे उपचाराचे जास्त बिल आकारले जात आहे, आणि सर्वसामान्य लोकांची देशात खासगी हॉस्पिटलकडून औषधे उपचारांच्या नावावर लाखो रूपयाची लुटमार करण्यात येत आहे. दिल्लीतील एका खासगी रूग्णालयात असा हा प्रकार घडला आहे, नंतर दिल्लीतील त्या खासगी रूग्णालयाकडून स्वतःहून औषधे उपचाराचे बिल कमी करण्यात आले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा