नाशिक – दहावीचा पेपर सुरू असताना विद्यार्थीनीसोबत एक लाजिरवाणा प्रकार घडला आहे. नाशिकमध्ये १३ मार्च २०२६ रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका विद्यार्थीनीसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पेपरच्या शेवटच्या तासात एका विद्यार्थिनीला अचानक त्रास सुरू झाला होता. त्यानंतर त्या विद्यार्थीनीने वर्गातील परीक्षकांना याबाबत सांगितले. बाथरूमला जाण्याची विनंती केली.
पण परीक्षकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. पेपर सुरू असताना बाहेर जाऊ देता येत नाही असे सांगत परिक्षकांनी बाथरूमला जाण्याची ही परवानगी नाकारली आहे. या असंवेदनशील निर्णयामुळे त्या विद्यार्थीनीला पेपर तशाच अवस्थेत बसून पूर्ण करावा लागला आहे. या कारणामुळे विद्यार्थिनीला मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागले आहे. त्या विद्यार्थीनीला पेपर लिहिण्यास अडथळा निर्माण झाला आहे. नुकतेच भारतातील सर्वोच्च न्यायालयाने मासिक पाळी व स्वतंत्र शौचालये व्यवस्थापन हा देशातील मुलींचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे.
तसेच देशातील शाळांमध्ये मोफत सॅनिटरी पॅड व स्वतंत्र शौचालये उपलब्ध करून देण्याबाबतही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने देखील मासिक पाळी रजेबाबत सकारात्मक विचार करत आहे व स्वतंत्र शौचालये बाबत आदेश दिलेले आहेत. नाशिकमधील दहावीच्या पेपरमध्ये घडलेल्या या प्रकाराने विद्यार्थिनीच्या नातेवाईकांकडून क्षिक्षण क्षेत्रांतील शिक्षकांविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे नाशिकमधील ही घटना केवळ एका विद्यार्थिनीची समस्या नसून भारत देशातील संपूर्ण व्यवस्थेतील संवेदनशीलतेचा अभाव आहे.
दहावीच्या व बारावीच्या पेपर दरम्यान लघवीसाठी परवानगी दिली जाते, मात्र मासिक पाळीसारख्या नैसर्गिक आणि आवश्यक कारणासाठी परवानगी न मिळणे ही गंभीर बाब मानली जात आहे. नाशिकमधील या घटनेनंतर संबंधित विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी राज्य सरकारविरोधात ही नाराजी व्यक्त केली आहे. तर हा प्रकार नाशिकमधील शालेय व्यवस्थापन आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या लक्षात आणून देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
या प्रकरणात कोणाही विरोधात वैयक्तिक तक्रार करण्यात आली नाही. ही एक राज्य सरकारची व शिक्षण़ क्षेत्रातील व्यवस्थात्मक चुक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिकमधील या प्रकरणात नाशिकच्या संबंधित परीक्षकांवर कारवाई करण्यापेक्षा संपूर्ण राज्य सरकारची शिक्षण प्रणाली, परीक्षा प्रणाली अधिक संवेदनशील आणि विद्यार्थी केंद्रित करण्याची गरज आहे, असे मत काही शिक्षण क्षेत्रातील लोकांनी व्यक्त केले आहे





