संगमनेर – अहिल्यानगर जिल्ह्यातील मुलीवरील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पोलिसांकडून आरोपीचे रेखाचित्र जारी करण्यात आले आहे. अहिल्यानगरमधील सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी केले आहे. पोलिसांनी माहिती देण्याचे आवाहन केले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मुलीवर ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहावीत शिकणार्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला करण्यात आला आहे.
पण ३ दिवस उलटूनही आरोपी अद्याप फरार आहे. अखेरीस पोलिसांनी संशयिताचे रेखाचित्र जारी केले आहे. या संशयित आरोपीची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. संगमनेर तालुक्यातील वडगावपान इथे ३ दिवसांपूर्वी १५ मार्च २०२६ रोजी शाळेमधील इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अज्ञात तरुणाने ॲसिड हल्ला केला होता. शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केलेले आहे. त्यानंतर अल्पवयीन मुलीला उपचारासाठी लोणी इथे हलवण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील इयत्ता सहावी मध्ये शिकणारी ही अल्पवयीन मुलगी आहे. ती शाळा सुटल्यानंतर घराच्या दिशेने आपल्या घरी जात असताना अचानक तिच्या समोर येऊन अज्ञात एक युवकाने तिच्या चेहऱ्यावरती ॲसिड फेकले आहे. मुलीने आरडाओरड केल्यानंतर आसपासचे नागरिक गोळा झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ॲसिड फेकणाऱ्या तरुणाचा पोलीस शोध घेत आहेत.
२ दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील रणखांब गावात लग्नाला नकार दिल्याने एका मुलीवर हल्ला केल्याची घटना घडली होती. संगमनेर तालुक्यात घडलेल्या या दुसऱ्या ॲसिड हल्ल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या ॲसिड हल्ल्यातील आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी गावातील स्थानिक नागरिकांनी केली आहे. या घटनेने नातेवाईकांसह गावकरीही चिंताग्रस्त आहेत. ही घटना कोणत्या कारणावरून झाली आहे? हे अजूनही स्पष्ट झाले नाही.
पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या अल्पवयीन मुलीवर संगमनेर येथील लोणी येथील प्रवरा रूग्णालयात दाखल असून उपचार सुरू आहेत. सहावीत शिकणार्या अल्पवयीन मुलीचा चेहरा ७ टक्के भाजला आहे. अल्पवयीन मुलीच्या चेहर्यावर ॲसिड फेकणारा तरूण अनोळखी असल्याचे पीडित मुलीने सांगितले आहे. मुलीच्या घरची परिस्थिती गरीब आहे. शाळेपासून ४ किमी अंतरावर हे कुटुंब वस्तीवर राहतात.
मुलीला वडिल नाहीत. त्यामुळे मामा त्यांचा सांभाळ करत आहे. या घटनेमुळे त्या अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय चिंताग्रस्त आहेत. आमच्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आई आणि अल्पवयीन मुलीच्या मामाने केली आहे. या ॲसिड हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ काही ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे. संगमनेर तालुक्यातील वडगावपान इथे सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.
हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. या ॲसिड हल्ल्यात अल्पवयीन मुलीच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला जखम झाली आहे. या जखमी मुलीवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ वडगावपान गावातील स्थानिक ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या अल्पवयीन मुलीवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली आहे. या घटनेचा अधिक तपास अहिल्यानगर पोलिस करत आहेत.





