उत्तरप्रदेश राज्यामध्ये कोल्ड स्टोरेजचे छत कोसळल्याने मोठा अपघात पाच मजुरांचा मृत्यू; दुर्घटनेनंतर गॅस लीक झाल्याने परिसरातील अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती समोर

SHARE:

उत्तरप्रदेश – राज्यामध्ये कोल्ड स्टोरेजचे छत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे, या अपघातात पाच मजुरांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये छत कोसळण्यापूर्वी परिसरात मोठा स्फोटासारखा आवाज ऐकू आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. कोल्ड स्टोरेजचे छत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या दुर्घटनेनंतर गॅस लीक झाल्याने परिसरातील अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे.

यामध्ये ५ मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. उत्तरप्रदेश राज्यातील प्रशासकीय यंत्रणेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हे कोल्ड स्टोरेज हे एका माजी मंत्र्याचे असल्याची माहिती मिळाली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. चांदपूर येथील एका कोल्ड स्टोरेजचे छत अचानक पत्त्यासारखी कोसळल्याने तेथे काम करणार्या मजुरांचा ढिगाऱ्याखाली दबून जागीच मृत्यू झाला आहे.

हा अपघात इतका जोरात छत कोसळण्यापूर्वी परिसरात मोठा स्फोटासारखा आवाज ऐकू आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी लोकांनी सांगितले आहे. या घटनेनंतर प्रयागराज परिसरात खळबळ उडाली आहे. प्रयागराजच्या घटनेत बचाव कार्यासाठी मोठी धावपळ सुरू आहे. माहितीनुसार, हे कोल्ड स्टोरेज चांदपूरच्या एका माजी आमदाराच्या मालकीचे असल्याची माहिती मिळाली आहे. नेहमीप्रमाणे मजूर तिथे आपले काम करत असताना अचानक भिंत कोसळली आहे.

स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार छत कोसळण्यापूर्वी मोठा स्फोटाचा आवाज झाला आणि काही क्षणातच संपूर्ण छप्पर मजुरांच्या अंगावर पडले आहे. अचानक घडलेल्या घटनेमुळे मजुरांना बचावासाठी बाहेर देखील येता आले नाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. ढिगारा उपसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ढिगार्याखालून आतापर्यंत ५  मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण दबले असल्याची शक्यता आहे. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ज्या कोल्ड स्टोरेजमध्ये ही दुर्घटना घडली ते समाजवादी पक्षाचे नेते यांची आहे. या अपघातातील जखमींवर योग्य उपचार करण्याचे आणि पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा