चाकणकर असंख्य महिलांना भोंदू खरातकडे घेऊन जायच्या; राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्यांच्या गौप्यस्फोट

SHARE:

मुंबई – अंधश्रद्धेचा खुला बाजार मांडून महिलांचे शोषण करणार्या भोंदू अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याचे नव नवे काळे कारनामे समोर येत आहे. हे प्रकरण राजकीय नेत्यांपर्यंत पोहचलं आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनी मोठा दावा केला आहे. रुपाली चाकणकर या असंख्य महिलांना अशोक खरातकडे घेऊन जायच्या असा, दावा आशा मिरगे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. एका वृत्तवाहिनींसी बोलताना आशा मिरगे यांनी हा गौप्यस्फोट केला.

राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे पुढे म्हणाल्या कि कुंपणच शेण खाते हे आपन ऐकलं होतं. पण इथं कुंपणाने शेत लांडग्याच्या हवाली केलय. असा कटाक्ष आशा मिरगे यांनी चाकणकरांवर केला. त्या म्हणाल्या महिला संघटनांच्या मिटिंगला भोंदू अशोक खरात जायचा. रुपाली चाकणकर त्या मिटिंगमध्ये अशोक खरातची प्रसंशा करायच्या. मी आज जिथे आहे तिथपर्यंत यांच्यामुळे पोहोचले असल्याचा दावा चाकणकर करायच्या. त्यामुळे समोर बसलेल्या भोळ्या भाबड्या महिला फसायच्या. चाकणकर या महिलांना अशोक खरातच्या जाळ्यात टाकायच्या.

अशोक खरातच्या कार्यालयात नितीन जाधव नावाचा मुलगा काम करायचा. त्याचं लग्न झाल्यानंतर बाबाची नजर त्याच्या बायकोवर गेली. भोंदू खरातने त्याला बायकोला भेटायला आणण्यास सांगितलं. माझा मालक काय करतो हे नितीनला माहित होते. यानंतर नितीनने ऑफिसमध्ये स्पाय कॅमेरे लावले. त्याचे फुटेज तो घेत राहिला. त्यातले काही फुटेज घेऊन हा गायब झाला, असं आशा मिरगे म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या कि तीन महिने गायब राहिल्यानंतर त्याने एका महिलेला क्लिप पाठवली. तिच्याकडे पैशांची मागणी केली. पण त्या संबंधित पीडित महिलेला घरातील पुरुषांनी मदत केली. त्यांनी तिच्यावर विश्वास दाखवला. कुटुंबियांनी तिला सहकार्य केलं. तेव्हा अहिल्यानगरमध्ये तिच्या कुटुंबियांनी नितीन जाधवविरोधात गुन्हा दाखल केला. हे आपल्याला भोवणार आहे, असे लक्षात येताच भोंदू खरातने लगेच नाशिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून हे व्हिडिओ मॉर्फ व्हिडिओ असल्याचा आरोप केला. पण ते फोटो आणि व्हिडीओ खरे असल्याचं पोलिसांना समजलं. नीरज जाधवचा मोबाईल तपासल्यानंतर त्याच्याकडे 58 व्हिडीओ असल्याचं समोर आलं. त्याचसोबत त्याच्याकडे अनेक व्हिडीओ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली
आशा मिरगे म्हणाल्या कि महिला आयोग हा महिलांना विश्वासाचं न वाटण्यामागचं कारण म्हणजे रुपाली चाकणकर होत्या. यापूर्वीच्या आयोगांच्या नावावर लक्ष टाकलं असता, एखाद्या महिलेला त्या आपल्या वाटतील असं असायचं.

पण रुपाली चाकणकरांचा ड्रेसिंग सेन्स, त्यांचा मेक अप, ग्लॅमर पाहून अनेक महिलांना कॉम्प्लेक्स व्हायचा. या महिलेचा वावर हा सतत मंत्री, अधिकारी यांच्यासोबतचा असायचा. त्या सतत राजकारण करायच्या. त्यामुळे कुणालाही त्या आपल्या वाटल्या नाहीत, असं आशा मिरगे म्हणाल्या.

आशा मिरगे यांनी दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर हे अशोक खरातचे पार्टनर असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की त्यांच्याकडे जाणाऱ्या लोकांमध्ये तीनप्रकारचे लोक आहेत. फक्त भेट देणारे आहेत. त्यांचे समर्थक आहेत. किंवा त्यांचे पार्टनर्स आहेत. त्यात एक नंबरवर दीपक केसरकर आणि दोन नंबरवर रुपाली चाकणकर. त्या म्हणाल्या कि अशोक खरातसोबत संबंध ठेवणाऱ्यांमध्ये अनेक आयएएस, आयपीएस अधिकारी आहेत. त्यामध्ये त्यांचे काही मित्रही आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा