परभणी – जिल्ह्यात शॉर्टसर्किट झाल्यामुळे ४ एकर गहू जळून खाक झाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत ४ एकर गव्हाचे नुकसान झाले आहे. परभणीतील शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे. परभणी जिल्ह्यातील मांडाखळी गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे.
शॉर्टसर्किट झाल्यामुळे डोळ्यांदेखत ४ एकर गहू जळून खाक झाला आहे. परभणी जिल्ह्यातील मांडाखळी या ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्यामुळे शेतकर्याच्या डोळ्यादेखत ४ एकर गहू जळून खाक झाला आहे. शेतातून गेलेल्या महावितरणच्या तारांमध्ये घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली आहे. परभणीच्या मांडाखळी गावामध्ये अत्यंत मनाला वेदना देणारी घटना घडली आहे.
मांडाखळी येथील शेतकरी रुस्तुम निवृत्ती शिराळ यांचा ४ एकर गहू त्यांच्या डोळ्यासमोर जळून खाक झाला आहे. हे चित्र पाहून शेतकऱ्याने दुःख व्यक्त केले आहे. शेतातून गेलेल्या महावितरणच्या तारांमध्ये घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाल्यामुळे शेतातील गव्हाला आग लागली आहे. ही आग भीषण असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आगीचे लोट पसरले आहेत.
गव्हाला अशा पद्धतीने आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेने सर्व गाव हळहळले आहे. आधीच राज्यातील शेतकरी राजा संकटात आहे. सध्या शेतमालाला चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तसेच कर्जबाजारीपणा आणि नापीकीला कंटाळून राज्यात अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत.राज्यात मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत असल्याचे चित्र दिसत आहे.





