सिंधुदुर्ग – जिल्ह्यात एका बांधकाम व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार उघड झाला आहे, तर या प्रकरणात बांधकाम व्यावसायिकाच्या डोक्यात गोळी लागल्याच्या खुणा दिसून आल्या आहेत. या बांधकाम व्यावसायिक मृत्यू प्रकरणात कणकवलीतील स्थानिक नागरिकांकडून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कणकवलीमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांचा मृतदेह अत्यंत संशयास्पद स्थितीत सापडला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात ही खळबळजनक घटना आता समोर आली आहे.
कणकवली शहरातील मुरेडोंगरी परिसरातील मोहनमळा येथे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांचा मृतदेह सापडला आहे. सुशांत दळवी यांच्या डोक्याला गंभीर इजा झालेली आहे. प्राथमिक तपासात ही जखम बंदुकीच्या गोळीची असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. कणकवली मध्ये बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी मृत्यू प्रकरणात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झालेल्या अवस्थेत मृतदेह आहे. कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
माहितीनुसार त्यांच्या डोक्याला बंदुकीची गोळी लागल्यासारखी जखम दिसून येत आहे, त्यामुळे हा घातपात आहे की अन्य काही प्रकार आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळाली नाही. मात्र डोक्यात गोळी लागून मृत्यू झाल्याचे दिसत आहे. तसेच काही अंतरावर रक्त पडलेले असल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू केला आहे. फॉरेन्सिक टीम ही दाखल झाली आहे.
बांधकाम व्यावसायिकाच्या मृत्यूमुळे कणकवली तालुक्यात खळबळ उडाली आहे. कणकवली शहरातील मोहनमळा परिसरात सुशांत दळवी यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना दिसून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेहाच्या काही अंतरावर रक्ताचे डाग दिसत आहेत. डोक्याला झालेल्या जखमेचे स्वरूप पाहता हा घातपात असण्याची शक्यता आहे. मात्र, हा प्रकार हत्या आहे की अन्य काही, याबाबत अजुन अधिकृत माहिती मिळालेली नाही. या घटनेचे गांभीर्य ओळखून कणकवली शहर पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली आहे, व पंचनामा सुरू केला आहे.
या घटनेतील बांधकाम व्यावसायिकाच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीमला बोलावण्यात आले आहे. कणकवली शहरातील सुशांत दळवींसारख्या मोठ्या बांधकाम व्यावसायिकाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने कणकवली तालुक्यात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. कणकवली पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहे. या घटनेत सीसीटीव्ही फुटेज आणि बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी केली जात आहे. या प्रकरणात अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.





