युद्धात इराणला सर्वात जास्त फटका बसेल अशा जागी इस्रायलने हल्ला केला आहे, ज्यामुळे IRGC चा पारा चढला आहे आणि त्यांनी मोठी धमकी दिली आहे, ‘आता तुम्ही बघत राहा’.

SHARE:

आंतरराष्ट्रीय : एकाबाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध समाप्तीसाठी प्रयत्न करत आहेत. इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरु आहे असं बोलत आहेत. दुसरीकडे हे युद्ध अधिक भीषण बनत चाललं आहे. इस्रायलने इराणवर अशा ठिकाणी वार केलाय की, IRGC ने थेट यावेळी जशास तसं उत्तर नसेल असं म्हटलं आहे.

मध्य पूर्वेत सुरु असलेलं युद्ध दिवसेंदिवस भीषण होत चाललं आहे. डोनाल्ड ट्रम्प एकाबाजूला अमेरिका अजून 10 दिवस इराणवर हल्ला करणार नाही, आमची इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरु आहे असं सांगत आहेत. पण त्याचवेळी दुसऱ्याबाजूला इस्रायलकडून इराणवर मोठे हल्ले सुरु आहेत. ही अमेरिका-इस्रायलची एक वेगळीच युद्ध निती दिसत आहे. दरम्यान इस्रायली सैन्याने इराणच्या न्यूक्लियर प्लांट म्हणजे अणू प्रकल्पावर मोठा हल्ला केला आहे. इराणच्या सरकारी मीडियाने सुद्धा न्यूक्लियर प्लांटवर हल्ला झाल्याची पृष्टी केली आहे. यात हेवी-वॉटर प्लांट आणि येलोकेक प्रोडक्शन प्लांट सुद्धा आहे. इस्रायलने या हल्ल्यात मध्य इराणमधील एका हेवी वॉटर रिएक्टरला टार्गेट केलं.

इराण विरुद्ध सैन्य कारवाईला गती देणार असल्याचं इस्रायलने म्हटल्यानंतर काही तासातच हा हल्ला झाला. इस्रायलने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून इराणने सुद्धा या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. अराकमध्ये शाहिद खोंडाब हेवी वॉटर कॉम्प्लेक्स आणि यज़्द प्रांतात अर्दकान येलोकेक प्रोडक्शन प्लांटला टार्गेट करण्यात आल्याचं इराणच्या अणू ऊर्जा संघटनेने म्हटलं आहे. या हल्ल्यात कोणीही जखमी झालेलं नाही. प्रदूषणाचा कुठलाही धोका नाहीय. इस्रायलने जून महिन्यात अराक प्लांटवर केलेल्या हल्ल्यापासून तो बंदच आहे.

यावेळी जशास तसं उत्तर नसेल, फक्त बघत रहा

इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कोरने (आयआरजीसी) या हल्ल्याला प्रत्युत्तर देणार असा इस्रायलला इशारा दिला आहे. आयआरजीसी एअरोस्पेस फोर्स कमांडर सैयद माजिद मूसावीने एक्सवर पोस्ट करुन अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना कार्यस्थळ सोडून जाण्यास सांगितलं आहे. म्हणजे इराणकडून आता अमेरिकी-इस्रायली कंपन्यांवर हल्ले होऊ शकतात. “तुम्ही या आधी सुद्धा आम्हाला आजमावलं आहे. तुम्ही आगीशी खेळत आहात. यावेळी जशास तसं उत्तर नसेल. फक्त बघत रहा” असं मूसावीने आपल्या धमकीत म्हटलं आहे.

ट्रम्प बोलले त्याचवेळी हल्ला

युद्ध समाप्तीसाठी चांगली चर्चा सुरु आहे. हॉर्मुझ स्ट्रेट उघडण्यासाठी इराणला अजून वेळ दिला आहे असा दावा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्याचवेळी इस्रायलने इराणच्या अणू प्रकल्पावर हल्ला केल्याची बातमी आली. आमची अमेरिकेसोबत कुठलीही चर्चा सुरु नाहीय असं इराणचं म्हणणं आहे.

त्यांना याची झळ सोसावी लागेल

बॅलेस्टिक मिसाइल आणि अन्य शस्त्रास्त्र बनवली जातात, त्या तेहरानमधील ठिकाणांना लक्ष्य केलं असं इस्रायली सैन्याकडून शुक्रवारी सांगण्यात आलं. पश्चिम इराणमधील मिसाइल लॉन्चर्स आणि गोडाऊनला लक्ष्य करण्यात आलं. इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्ज म्हणाले की, इराणला या युद्ध गुन्ह्यासाठी मोठी आणि भारी किंमत चुकवावी लागेल. इराणकडून सातत्याने हल्ले होत आहेत. त्यामुळे इराणवरील हल्ले आणखी वाढवणार. इस्रायली नागरिकांविरोधात जे शस्त्रास्त्र बनवतात त्यांना याची झळ सोसावी लागेल असं म्हटलं.

Leave a Comment

अधिक वाचा