‘ही’ भाजी पोट साफ ठेवण्यापासून ते शरीरातील पाण्याची पातळी व्यवस्थित ठेवण्यापर्यंत मदत करते.

SHARE:

आरोग्य : हिरव्या भाज्या आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण उन्हाळी ही भाजी या ७  लोकांसाठी वरदानपेक्षा कमी नाही. चला तर मग आजच्या लेखात त्याचे सेवन केव्हा आणि कसे करावे हे जाणून घेऊयात.

कडक उन्हाळा सुरू झाला आहे. वाढत्या उष्णतेमुळे त्याचा परिणाम हा शरीरावर होत असतो आणि त्यासोबतच पचनाच्या समस्यांचा देखील सामना करावा लागतो. अशावेळेस आरोग्य तज्ञ दोडक्याची भाजी खाण्याची शिफारस करतात. ही एक उत्तम आणि नैसर्गिक पर्याय आहे. तसेच ही उन्हाळ्याच्या हंगामातील भाजी नियमित सेवन केल्याने केवळ पचनसंस्थाच मजबूत होत नाही, तर शरीरातील पोषक तत्वांची कमतरता देखील टाळता येते. दोडका ही एक स्वस्त, सहज उपलब्ध होणारी आणि आरोग्यदायी भाजी आहे, जी उन्हाळ्यात कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते . भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या मते दोडक्याच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठता टाळण्यास आणि पोट स्वच्छ ठेवण्यास मदत होते. चला तर मग दोडक्याची भाजी खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात ते आजच्या लेखात जाणून घेऊयात.

दोडक्यातील पोषक तत्वे
दोडक्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियम यांसारखी पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे ही भाजी सेवन करण्याचे आरोग्याला पोषक तत्वे मिळतात.

दोडका खाण्याचे फायदे-

1. शरीरातील योग्य पाण्याची पातळी-

उन्हाळ्यात दोडका खाणे आरोग्यासाठी वरदान ठरते. कारण दोडक्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यास मदत होते.

2. पचन सुधारते-

उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढते, ज्यामुळे पचनक्रिया बिघडते. दोडका ही एक हलकी आणि सहज पचणारी भाजी आहे. त्यातील फायबर पचनसंस्थेला बळकट करते आणि बद्धकोष्ठता, गॅस व अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम देते.

3. पित्तापासून आराम-

आयुष मंत्रालयाच्या मते पित्ताशयाचा विकार संतुलित ठेवण्यासाठी दोडका उपयुक्त ठरतो. त्यामुळे दोडक्याच्या भाजीचं तुमच्या आहारात समावेश करा.

4. श्वसनाच्या समस्या

ज्या लोकांना श्वसनाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी दोडक्याचे सेवन फायदेशीर मानले जाते.

5. आतड्यातील जंत-

दोडक्याची भाजी ताप, खोकला आणि पोटातील जंत दूर करण्यासाठी देखील फायदेशीर मानली जाते.

6. उष्माघात टाळण्यासाठी

दोडका शरीराला थंडावा देतो. त्यामुळे उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यास मदत होते.

7. त्वचेसाठी फायदेशीर-

दोडक्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचा निरोगी ठेवतात आणि उन्हामुळे होणाऱ्या मुरुमे, पुरळ आणि खाज यांसारख्या त्वचेच्या समस्या कमी करतात.

दोडक्याची भाजी कशी आणि केव्हा खावी –

दोडक्याची भाजी बनवण्याचे अनेक सोपे मार्ग आहेत. ही भाजी तुम्ही बटाटे, चणे किंवा हरभरा डाळीसोबत बनवून सेवन करू शकता. दोडक्याची भाजी ही दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी खाल्ला जाऊ शकतो.

Leave a Comment

अधिक वाचा

नागपुरात एका NGO मध्ये हैराण करणारी घटना समोर आली आहे, ज्यात एका व्यक्तीने महिलेच्या कपाळावर किस करण्याचा प्रयत्न केला आणि तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलीस देखील चक्रावले आहेत!