पुणे – शहरात अनैतिक मानवी वाहतूक आणि वेश्या व्यवसाया विरोधात कडक कारवाई करण्यात आली आहे, तर या प्रकरणात ३ जणांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील एका कॉलेजजवळ पोलिसांकडून देहविक्री रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. पुण्यातील एका लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू होता. या कारवाईत ४ तरुणींची सुटका करण्यात आली आहे. पुण्याच्या न-हेगाव भागात वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. न-हेगाव भागातील एका नामांकित कॉलेजजवळ सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे.
पुणे शहरात मागील काही दिवसांपासून आसपासच्या भागात विविध गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या चंदननगर परिसरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आले होते. आता पुण्याच्या न-हेगाव भागात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. न-हेगाव एका नामांकित कॉलेजजवळ सुरू असलेल्या सेक्स रॅकेटमधील ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांनी वेश्याव्यवसायात गुंतलेल्या ४ तरुणींची सुटका केली आहे. माहितीनुसार, पुणे पोलिसांनी शहरातील अनैतिक मानवी वाहतूक आणि वेश्याव्यवसायाविरोधात मोठी कडक कारवाई केली आहे.
पुण्यातील गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने न-हेगाव परिसरातील एका लॉजवर धाड टाकली आहे. या कारवाईत पुणे पोलिसांनी ४ तरुणींची सुटका केली आहे, तर 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील न-हेगाव येथील ग्रीन व्हॅली लॉज, सूर्यकांत लॉज, स्वर्ग एक्झिक्युटिव्ह पॅराडाईज लॉज, गोल्डन स्टार लॉज या सर्व लॉजवर पुणे पोलिसांनी वेश्याव्यवसाय प्रकरणी धाड टाकली आहे. पुण्यातील पोलिसांच्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंध कक्षाला अनैतिक मानवी वाहतूक आणि वेश्याव्यवसायाविरोधात गुप्त माहिती मिळाली होती.
पुण्यातील न-हेगाव येथील झील कॉलेजवळील स्वर्ग एक्झिक्युटिव्ह पॅराडाईज लॉज येथे महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे. या माहितीची खात्री केल्यानंतर पुणे पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी लॉजवर धाड टाकून कडक कारवाई केली आहे. या कारवाईत वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या ४ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांकडून अभिषेक दिलीप गवळी, खेड शिवापूर रामू सांडू देवकर, सिंहगड रोड, आणि महेश गणेश नागने, न-हेगाव, पुणे या तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात न-हेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात अधिक तपास पुणे पोलिस करत आहेत.





