४२.५ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बनावट नोटा देऊन कार विकत घेणाऱ्या टोळीला अटक

SHARE:

पिंपरी चिंचवड – पुण्यामध्ये ४२.५ लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत, तर बनावट नोटा देऊन कार पळवणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. पुण्यात बनावट नोटा घोटाळा उघडकीस आला आहे. ५०० रुपयांच्या बनावट नोटांनी भरलेली बॅग दिली व कार घेऊन आरोपी पळुन गेल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. बारामती येथील हुजेब फिरोज बागवान हे त्यांचे मित्र अरबाज शेख यांची चारचाकी गाडी विकण्यासाठी पुण्यात आले होते. पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही.

पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेवरे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय चलनी नोटांसारख्या दिसणाऱ्या खेळण्यातील बनावट नोटा देऊन ३.५० लाखांची कार पळवणाऱ्या टोळीला चाकण पोलिसांनी अटक केले आहे. या घटनेतील आरोपींकडून गुन्ह्यातील कारसह ४२.५० लाख रुपये किमतीच्या खेळण्यातील नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, बारामती येथील हुजेब फिरोज बागवान हे त्यांचे मित्र अरबाज शेख यांची चारचाकी गाडी विकण्यासाठी पुण्यात आले होते. आरोपी गणेश ज्ञानदेव ढाकरे याने फोनवरून संपर्क साधून गाडी खरेदी करण्याचा बहाणा केला होता.

५ एप्रिल २०२६ रोजी चाकणमधील माणिक चौकात ३.५० लाख रुपयांत व्यवहार ठरला होता. आरोपीने प्लॅस्टिक रॅपरमध्ये गुंडाळलेले ५०० रुपयांच्या नोटांचे ६ बंडल बारामती येथील हुजेब फिरोज बागवान यांना दिले आणि बाकी ५० हजार रुपये नावावर ट्रान्सफर झाल्यावर देण्याचे कबूल केले होते. पैसे देऊन आरोपी गाडीसह पळून गेला. काही वेळानंतर बारामती येथील हुजेब फिरोज बागवान यांनी नंतर बंडल उघडून पाहिले असता, त्यामध्ये वरची आणि खालची नोट खरी होती, मात्र मधल्या सर्व नोटा खेळण्यातील बनावट नोटा असल्याचे लक्षात आले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर बारामती येथील हुजेब फिरोज बागवान यांनी चाकण पोलीस ठाण्यामध्ये गेले आहेत. व गाडी चोरी झाल्याची व बनावट नोटा देऊन फसवणुक झाल्याचे पोलिसांत सांगितले आहे. त्यांनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गुप्त माहितीच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला आहे. गणेश ज्ञानदेव ढाकरे आणि समीर दिनकर महल्ले या २ आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींकडून बनावट नोटा देऊन फसवणूक करून नेलेली चारचाकी गाडी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आली आहे.

या प्रकरणात आरोपींकडून ४२.५ लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. कारची तपासणी केली असता कारमध्ये ४२.५ लाख रुपयांच्या ५०० रुपयांच्या खेळण्यातील बनावट नोटा, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, नोटांचे बंडल पॅक करण्याचे साहित्य असा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. रोख रकमेचे व्यवहार करताना नागरिकांनी नोटांची नीट खात्री करावी, असे आवाहन चाकण पोलिसांकडून करण्यात आले आहे. या प्रकरणात अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा