स्वस्तात घर देण्याच्या बहाण्याने महिलांची लाखो रूपयांची फसवणूक; मुंबई आणि पुण्यात गुन्हे दाखल

SHARE:

मुंबई – स्वस्तात घर देण्याच्या बहाण्याने महिलांची लाखो रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपीविरोधात मुंबई आणि पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही महिलांना लग्नाचे आमिष ही दाखवले आहे. वडील अधिकारी असल्याच्या थापा मारत एका व्यक्तीने महिलांकडून लाखो रूपये घेतल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईमध्ये महिलांना स्वस्त दरात घर मिळवून देतो, असे सांगत या आरोपीने सुरुवातीला टोकन रक्कम मागितली. घर मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक महिलांकडून पैसे घेतले आहेत.महिलांना फसवणुक करणार्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

एका मॅट्रिमोनियल वेबसाइटवरून ओळख करून लग्नाचे आमिष दाखवत काही महिलांची लाखो रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पुण्यातील विराज बाळासाहेब भोसले असे नाव सांगणाऱ्या आरोपीविरोधात मुंबई आणि पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आरोपीने मुंबईतील दहिसर, मुलुंड आणि नालासोपारा येथील अनेक महिलांशी संपर्क साधत मोठी आर्थिक फसवणुक केली आहे. स्वतःची ओळख पुण्यातील विराज भोसले अशी करून दिली होती. तसेच तो एका एनजीओचा अध्यक्ष असल्याचा दावा करत वडील आयपीएस अधिकारी असून राज्यातील सरकारी योजनांशी संबंध असल्याचे सांगून मुंबई व पुणे येथील अनेक महिलांचा विश्वास संपादन करून अनेक महिलांची मोठी फसवणुक केली आहे.

मुंबई व पुणे येथील महिलांकडून लाखाच्या रकमा घेतल्या आहेत. या आरोपीने मुंबई व पुण्यातील महिलांना स्वस्त दरात घर मिळवून देतो, असे सांगत आरोपीने सुरुवातीला टोकन रक्कम मागितली होती. नंतर घर मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलांकडून पैसे घेतले आहेत.पुण्यातील एका महिलेकडून ६० लाख रुपये, मुंबईतील नालासोपारा येथील महिलेकडून ९.५० लाख रुपये, तर दहिसर येथील महिलेकडून १२ लाख रुपये, तर मुलुंड येथील महिलेकडून १८ लाख रूपये घेतले गेले. त्यानंतर आरोपीने वैयक्तिक कर्ज काढायला लावून काही महिलांकडून आणखी रक्कम मिळवली आहे, आणि संपर्क बंद केला आहे.

या आरोपीने या घटनेमध्ये महिलांना खरे नाव सांगितले नाही. मुंबई व पुण्यातील महिलांना खोट्या नावाने फसवले आहे. काही महिलांनी पैसे परत मागितल्यानंतर आरोपीने धमक्या दिल्या आहे, शिवीगाळ केली आहे. तसेच राजकीय दबाव आणि पोलीस ओळखीचा धाक दाखवला आहे, असा या आरोपीवर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील एका महिला तक्रारदराने आता हे संपूर्ण प्रकरण बाहेर काढले आहे. काही महिलांकडून किरकोळ कारणांसाठी एकूण १२ लाखांची फसवणूक केली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार विराज हे त्याचे खरे नाव नसून तो लोकांना लुबाडण्यासाठी तो हे नाव वापरत होता.

या कटात त्याचे संपूर्ण कुटुंब सामील असल्याचा ही आरोप ही एका महिला तक्रारदराने केला आहे. सोशल मीडियावर तपास केल्यानंतर इतर महिलांचीही याच पद्धतीने फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आहे. या प्रकरणात मुंबईतील नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील दहिसर, नालासोपारा, नवघर आणि पुण्यातील चंदननगर पोलिस ठाण्यातही या आरोपीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत ४ महिलांनी आरोपी विराज भोसले विरोधात तक्रार दाखल केली आहे. सर्व प्रकरणांत एकाच पध्दतीने महिलांना फसवण्यात आले आहे. या आरोपीला पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणात पुढील तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Comment

अधिक वाचा