आयपीएल २०२६ : मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्सला त्यांच्या घरच्या मैदानात एकूण तिसरा सामना जिंकण्यापासून रोखण्यात अपयशी ठरली आहे. यजमान संघाने पलटणवर २७ धावांनी मात करत सलग तिसरा सामना जिंकला आहे.
मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्सला त्यांच्या घरच्या मैदानात एकूण तिसरा सामना जिंकण्यापासून रोखण्यात अपयशी ठरली आहे. यजमान संघाने पलटणवर २७ धावांनी मात करत सलग तिसरा सामना जिंकला आहे.
वैभव सूर्यवंशी याने ३९ आणि रियान पराग याने २० धावा जोडल्या. ध्रुव जुरेल २ धावांवर बाद झाला. तर शिमरॉन हेटमायर आणि यशस्वी जैस्वाल जोडी नाबाद परतली. राजस्थानसाठी यशस्वी जैस्वाल याने सर्वाधिक आाणि नाबाद ७७ धावा केल्या. तर हेटमायरने ६ रन्स केल्या. मुंबईसाठी अल्लाह गजनफर याने २ विकेट्स मिळवल्या. तर शार्दूलने वैभवला आऊट करत एकमेव मात्र महत्त्वाची विकेट घेतली.
मुंबईची बॅटिंग
मुंबईच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी विजयी धावांचा पाठलाग करताना निराशा केली. रोहित शर्मा ५, सूर्यकुमार यादव ६ आणि रायन रिकेल्टन याने ८ धावांचं योगदान दिलं. कॅप्टन हार्दिक पंड्या ९ रन्सवर आऊट झाला. या प्रमुख फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. नमन धीर आणि शेरफेन रुदरफोर्ड या दोघांनी प्रत्येकी २५-२५ धावा जोडल्या. मात्र इतरांनी साथ न मिळाल्याने मुंबईला ९ विकेट्स गमावून १२३ धावाच करता आल्या. राजस्थानसाठी रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर आणि संदीप शर्मा या तिघांनी प्रत्येकी २-२ विकेट्स मिळवल्या. तर जोफ्रा आर्चर आणि तुषार देशपांडे या दोघांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवली.
स्कोअरकार्ड

राजस्थानची पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप
दरम्यान राजस्थानने सलग तिसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये कमाल केली. राजस्थान पंजाब किंग्सला पछाडत पहिल्या स्थानी पोहचली आहे. राजस्थानचा नेट रनरेट हा +२.४०३ असा झाला आहे.





