बारामती – एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे, तर या प्रकरणात एका ५२ वर्षीय नराधमाला अटक करण्यात आली आहे. या घटनेने बारामतीत मोठी खळबळ उडाली आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. १० वर्ष जेलमध्ये राहुन आलेल्या आरोपीने पुन्हा बाहेर येताच गुन्हा केला आहे. एका अल्पवयीन मुलीवर भयानक कृत्य केल्याचे आता उघडकीस आले आहे. या प्रकरणातील या आरोपीने २००९ मध्ये एका १३ वर्षीय मुलीवर अशाच प्रकारे अत्याचार केला होता.
त्या गुन्ह्यात त्याला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली होती पुणे जिल्ह्यातील बारामतीत ही संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमध्ये चॉकलेटचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर शेजाऱी राहणाऱ्या आरोपीने अत्याचार केला आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणात बारामती शहर पोलिसांकडून या आरोपीला अटक करण्यात आले आहे. ओळखीचा गैरफायदा घेऊन या ५२ वर्षीय आरोपीने हे भयंकर कृत्य केले आहे.
पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने बारामतीत तक्रार दाखल केली आहे. परंतु या प्रकरणातील आरोपी शहर सोडून पळुन जायच्या तयारीत होता. मात्र बारामती पोलिसांकडून आरोपीला एसटी स्टँड परिसरातून अटक करण्यात आली आहे. आरोपीने काही दिवस जेलमध्ये शिक्षा भोगली आहे पण आरोपीची मनोवृत्ती बदलली नाही. या प्रकरणातील आरोपीने पुन्हा एकदा १० वर्षांच्या अल्पवयीन मूलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.
या आरोपीने अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरात नेले, आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला आहे. व त्या अल्पवयीन मुलीला कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली होती. मात्र, पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाने हिंमत दाखवत बारामती पोलीस स्टेशन मध्ये गेले आहेत. आणि आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
त्यानंतर बारामती शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेतला आहे, व आरोपीला अटक करण्यात आले आहे. या आरोपीला येरवडा जेलमध्ये पाठवण्यात आले आहे. राज्यात महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस कटिबद्ध असून अशा विकृत गुन्हेगारांविरुद्ध कायदेशीर कडक कारवाई केली जाईल, असे पोलीस निरीक्षक श्रीशैल शेट्टी यांनी म्हटले आहे. या प्रकरणात अधिक तपास बारामती पोलिस करत आहेत.





