अहिल्यानगर – शिर्डीतील बेकायदेशीर सावकारकीच्या गुन्ह्यात आणि आर्थिक फसवणूक प्रकरणात, अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरातही मुख्य आरोपी असल्याची माहिती मिळाली आहे. नाशिक जिल्ह्यामधील सिन्नरच्या पाडळी गावाची लेक ते शिर्डीच्या कोट्यावधींच्या फसवणुक प्रकरणात अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात मुख्य आरोपी असल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी भोंदूबाबा अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिने जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. तरी शिर्डीतील आर्थिक फसवणुक प्रकरणात शिर्डी पोलिसांनी तिला मुख्य आरोपी केले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीतील मोठी आर्थिक फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारकीच्या गुन्ह्यात नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचा भोंदूबाबा अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात हीदेखील मुख्य आरोपी आहे, असे पोलिसांनी माहिती दिली आहे.
नाशिक व अहिल्यानगरमध्ये अध्यात्म आणि दैवी शक्तीच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातचे काळे कारनामे आता एकामागून एक समोर आले आहेत. भोंदूबाबा अशोक खरात नाशिक पोलिसांच्या कोठडीत आहे. भोंदूबाबा अशोक खरातची पत्नी कल्पना खरात मात्र गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे. अटक टाळण्यासाठी तिने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता न्यायालयात धाव घेतली आहे. तिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर महत्त्वाची सुनावणी होणार आहे. नाशिक व अहिल्यानगर पोलिसांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, कल्पना खरातचे मूळ नाव सुनीता शिंदे आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पाडळी हे कल्पना खरातचे जन्मगाव आहे. १९९३ साली कल्पना खरातचा विवाह अशोक खरातशी झाला आहे. आणि ती सुनीता शिंदेची कल्पना खरात झाली आहे. भोंदूबाबा अशोक खरातच्या फसवणुक प्रकरणात कल्पना खरातचीही मोठी भागीदारी असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. ३१ मार्च २०२६ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी पोलीस ठाण्यात भोंदूबाबा अशोक खरात व त्याची कल्पना खरातसह ५ जणांवर मोठी आर्थिक फसवणूक आणि सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात शिर्डी पोलिसांनी आतापर्यंत २ आरोपींना अटक केली आहे. ते आरोपी सध्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत.शिर्डीत गुन्हा दाखल झाल्यापासून भोंदूबाबा अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार आहे.
शिर्डी पोलिसांनी १ एप्रिल २०२६ रोजी तिच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी केली आहे. शिर्डीतील मोठी आर्थिक फसवणूक आणि सावकारकीचा गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी अरविंद बावके याच्या नावाने कल्पना खरातने पॉवर ऑफ ॲटॉर्नी दिली होती, ज्यावरून आर्थिक व्यवहारांमधील तिची सक्रियता स्पष्ट झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी शहरात अनेक ठिकाणी भागीदारीत जमिनी आणि मालमत्ता असलेल्या कल्पना खरातचा शिर्डी पोलीस शोध घेत आहेत. तर भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणात अधिक तपास शिर्डी पोलिस करत आहेत.





