व्यवसाय : डी मार्ट स्टोअरमध्ये जाऊन शॉपिंग करावी की डी मार्ट रेडी अॅपवरून? ९९ टक्के लोकांना माहिती नाही ऑनलाइन शॉपिंगचे फायदे.
मुंबई, पुण्यासह महाराष्ट्र–गुजरातमधील अनेक शहरांमध्ये डी मार्ट हे नाव म्हणजे स्वस्त दरात उत्तम दर्जाची खरेदी अशी ओळख बनले आहे. किराणा सामानापासून घरगुती वस्तू, कपडे, इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत डी मार्ट नेहमीच ग्राहकांची पहिली पसंती राहिली आहे. मात्र आता डी मार्ट ने आपली डी मार्ट रेडी ही ऑनलाइन सेवा अधिक वेगाने आणि प्रभावीपणे सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांसमोर एक प्रश्न उभा राहतोय की ऑफलाइन डी मार्ट स्टोअरमधून खरेदी करणे परवडते की डी मार्ट रेडी अॅप/वेबसाइटवरून?
डी मार्ट च्या ऑफलाइन स्टोअरमध्ये खरेदी करताना अनेक ग्राहकांना आजही अधिक विश्वास वाटतो. कारण येथे समोरासमोर माल तपासता येतो, पॅकिंग, एक्स्पायरी डेट आणि दर्जा स्वतः पाहता येतो. मोठ्या प्रमाणात महिन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी हे स्टोअर विशेष सोयीचे ठरते. कारण एकाच वेळी सगळा माल खरेदी करून ताबडतोब घरी नेता येतो.
काही शहरांमध्ये बिल २००० रुपयांपेक्षा जास्त असल्यास मोफत होम डिलिव्हरीची सुविधाही डी मार्ट देते. याशिवाय नियमित ग्राहकांसाठी स्टोअरमध्येच ‘जास्त खरेदी करा, जास्त बचत करा’ स्क्रॅच कार्ड्स, विशेष ऑफर्स आणि सवलती मिळतात ज्यामुळे एकूण बिलावर चांगली बचत होते.
डी मार्ट रेडी ऑनलाइनचे फायदे
वेळेअभावी स्टोअरला जाणे शक्य नसलेल्या ग्राहकांसाठी डी मार्ट रेडी अॅप आणि वेबसाइट हा एक उत्तम पर्याय ठरत आहे. येथे किराणा, भाज्या-फळे, घरगुती वस्तू, कपडे ते काही प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घरी बसल्या मागवता येतात. डी मार्ट रेडी वर दररोज सकाळी १० वाजता ‘फ्लॅश सेल’ असते, ज्यामध्ये निवडक वस्तूंवर ३० ते ५० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते. पहिल्यांदा ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांना ४९९ रुपयांपेक्षा जास्त खरेदीवर १५० रुपयांची सूट आणि १ महिना मोफत डिलिव्हरीचा लाभ मिळतो.
याशिवाय पिक-अप पॉईंट हा पर्यायही उपलब्ध आहे. यामध्ये ऑनलाइन ऑर्डर करून जवळच्या डी मार्ट मधून स्वतः माल उचलल्यास अतिरिक्त ३ ते ५ टक्के सूट मिळते. नियमित ग्राहकांसाठी सबस्क्रिप्शन प्लॅन देखील आहे. दरमहा सुमारे ९९ रुपये भरून दुध, भाजीपाला यांसारख्या रोजच्या वस्तूंवर १० ते २० टक्के हमखास बचत करता येते.





