पाषाण तलावात हजारो माशांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघड; महापालिकेकडून ४ अधिकारी निलंबित करण्यात आले

SHARE:

पुणे – पाषाण तलावात हजारो माशांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे, तर या प्रकरणात पुणे महापालिकेकडून ४  अधिकारी निलंबित करण्यात आले आहेत. पुण्यातील पाषाण तलावात कर्मयार्यांच्या दुर्लक्षामुळे हजारो माशांचा मृत्यू झाला आहे. पुणे महापालिकेकडून या घटनेमुळे ४ अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. पुण्यातील निसर्गरम्य पाषाण तलावात मोठ्या संख्येने मासे आणि जलचरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पुणे महापालिका प्रशासनाकडून संबंधित दोषी कर्मचार्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यातील पाषाण तलावात हजारो माशांचा मृत्यू झाला आहे. पुणे महापालिका प्रशासनकडून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पुणे महापालिका आयुक्तांनी ४ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. मुख्य अभियंत्यालाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे पुणे महानगरपालिका क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे महापालिकेने मलनिस्सारण आणि क्षेत्रीय कार्यालयातील ४ जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यात अजयकुमार वायसे कार्यकारी अभियंता, मलनिस्सारण विभाग, अतुलकुमार कट कनिष्ठ अभियंता, विजय भोईर आरोग्य निरीक्षक, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय आणि विनायक चोपडे आरोग्य निरीक्षक,औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय या महापालिका कर्मचार्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच, पुणे महापालिकेतील मलनिस्सारण व देखभाल दुरुस्ती विभागाचे मुख्य अभियंता जगदीश खानोरे यांनाही या घटनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे नोटीस पाठवली आहे.

पुण्यातील पाषाण तलावाजवळ १५ व्या वित्त आयोगांतर्गत १ एमएलडी क्षमतेचा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला होता. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू नव्हता. प्रक्रिया न केलेले मैलापाणी सांडपाणी तलावात सोडले जात होते. या विषारी सांडपाण्यामुळे तलावातील ऑक्सिजनची पातळी घटली आणि हजारो माशांचा मृत्यु झाला आहे, अशी माहिती पुणे महापालिका चौकशीत समोर आली आहे. या दुर्लक्षपणामुळे पाषाण तलावातील पर्यावरणाचे नुकसान झाले आहे. व पाषाण तलावातील आसपासच्या परिसरातील सार्वजनिक आरोग्यालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. पाषाण तलावाच्या परिसरातील स्थानिक नागरिकांनी आणि पर्यावरण प्रेमींनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पुणे महापालिकेने गंभीर दखल घेऊन प्रशासकीय कडक कारवाई केली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा