मुंबई – मीरा-भाईंदर मधे मोठा सिलेंडर स्फोट झाला आहे, तर या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील मीरा-भाईंदरमध्ये सिलेंडर स्फोट झाला आहे. या घटनेत झोपडपट्टी उद्ध्वस्त झाली आहे. आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील मीरा-भाईंदर पूर्व भागामध्ये इंद्रलोक पोलीस चौकीचा परिसर आहे. या ठिकाणी लोधा कॉम्प्लेक्सच्या मागे मोकळी जागा आहे, तिथे अचानक मोठा सिलेंडर स्फोट झाला आहे. मुंबईतील मीरा-भाईंदर पूर्व भागामध्ये मोकळ्या जागेत असलेल्या इंद्रलोक पोलीस चौकीच्या परिसरातील झोपडपट्ट्यांना मोठी भीषण आग लागली.
या भीषण आगीमध्ये ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. आगीच्याया अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींनो नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग लागलेल्या ठिकाणावरून २९ सिलेंडर सापडले आहेत. या परिसरात आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीच्या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, मुंबईतील मीरा-भाईंदर पूर्व भागामध्ये इंद्रलोक पोलीस चौकीचा परिसर आहे. या ठिकाणी लोधा कॉम्प्लेक्सच्या मागे मोकळी जागा आहे. या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत.
शुक्रवारी रात्री अचानक आग लागली आहे. भीषण आग लागल्यामुळे अनेक झोपडपट्ट्यांना आग लागल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत आग लागल्यानंतर अनेक सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. रात्री या आगीमध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस अधिकारी राहुल चव्हाण यांनी दिली आहे. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या आगीच्या घटनेत मोठा सिलेंडरचा साठा सापडला आहे. ही आग नेमकी कशाने लागली हे आतापर्यत समजू शकले नाही. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा साठा असल्याचे पाहायला मिळाले आहे. या ठिकाणाहून अग्निशमन दलाच्या जवानांनी 29 सिलेंडर बाहेर काढले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलेंडर आले कुठून? हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणच्या ही झोपडपट्टीधारकांचे मोठे नुकसान झाले आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी अग्निशमन विभाग आणि स्थानिक नवघर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हजर झाले. या ठिकाणी झोपडपट्टीत अनेक कुटुंबे राहत असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अग्निशमन विभागाने केले आहे. ही एवढी मोठी आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आली नाही. या आगीमध्ये अनेक झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या आहेत. या आगीत काही वाहने सुद्धा जागीच जळाली आहेत. या घटनेचा अधिक तपास मुंबई पोलिस करत आहेत.





