वाघाच्या हल्ल्यात अल्पवयीन मूलाचा मृत्यू; अर्जुनी-मोरगाव तालुक्यात वनविभागाच्या विरोधात संताप

SHARE:

गोंदिया – जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात अल्पवयीन मूलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अर्जुनी-मोरगाव तालुक्यात वनविभागाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यात घराच्या अंगणात खेळणाऱ्या अल्पवयीन मुलावर वाघाचा हल्ला झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील धाबेटेकडी गावात अल्पवयीन मूलगा प्रज्वलवर वाघाचा हल्ला झाला आहे. या घटनेत त्या अल्पवयीन मूलाचा मृत्यू झाला आहे. धाबेटेकडी गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेत वनविभाग सावध झाला आहे. ग्रामस्थांनी वनखात्याकडून मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

गावातील स्थानिक नागरिकांकडून वनखात्याला वाघाच्या बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. गोंदियामध्ये अल्पवयीन मूलावर वाघाचा हल्ला झाल्यामुळे अर्जुनी-मोरगाव तालुक्यात लोकांमध्ये वाघाची दहशत वाढली आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील धाबटेकडी गावात घराच्या अंगणात खेळणाऱ्या 6 वर्षांच्या मूलाला वाघाने त्याच्या कुटुंबासमोरच उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाघाच्या हल्ल्यात प्रज्वल गोवर्धन मेश्राम या लहान मूलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने अर्जुनी-मोरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील धाबेटेकडी गावात घडली आहे.

संध्याकाळच्या सुमारास प्रज्वल आपल्या घराच्या अंगणात खेळत होता. आधीच दबा धरून बसलेल्या वाघाने प्रज्वलवर झडप घातली. वाघाने त्याला तोंडात पकडले आणि जवळच्या जंगलाच्या दिशेने गेला. प्रज्वलच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी आरडाओरड करत वाघाचा पाठलाग केला. काही वेळ शोध घेतल्यानंतर घरापासून काही अंतरावर प्रज्वल गंभीर जखमी अवस्थेत सापडला आहे. गावातील ग्रामस्थांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला आहे. 6 वर्षांच्या मूलाचा असा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने गावात ही भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर धाबेटेकडी गावाच्या परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाने आता घराच्या अंगणापर्यंत आल्यामुळे ग्रामस्थांनी वनखात्याच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच अर्जुनी-मोरगाव वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी पंचनामा केला आहे. गावातील संतप्त ग्रामस्थांनी नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. आणि मृत मुलाच्या कुटुंबाला वनखात्याकडून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. या परिसरात वाघाचा वावर वाढल्यामुळे अर्जुनी-मोरगाव वनविभागाने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. रात्रीच्या वेळी मुलांना घराबाहेर किंवा अंगणात एकटे सोडू नका. रात्रीच्या वेळी गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. शेतात किंवा बाहेर जाताना एकटे न जाता समूहाने जा आणि सोबत काठी किंवा टॉर्च ठेवा, असे अर्जुनी-मोरगाव वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा