बुलढाणा : राज्यात झालेल्या नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दमदार कामगिरी केली. पण काही ठिकाणी अजूनही पक्षामध्ये मतभेद, कुरबुरी आहेत.
चार वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं. शिवसेनेतील आमदारांचा एक मोठा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला. उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त १० ते १५ आमदार राहिले. पुढे जाऊन निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली. आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची व्याप्ती मोठी आहे. राज्यातील अनेक भागात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा विस्तार झाला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे ५७ आमदार निवडून आले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फक्त २० जागांवर समाधान मानावं लागलं.
त्यानंतर राज्यात झालेल्या नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दमदार कामगिरी केली. पण काही ठिकाणी अजूनही पक्षामध्ये मतभेद, कुरबुरी आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवनियुक्त बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख संजय सोनार यांच्या समोरच शिवसेनेच्या दोन गटात राडा झाल्याची घटना समोर आलीय. सुरूवातीला बाचाबाची वरून प्रकरण धक्काबुक्की वर गेले. यामुळे शिंदे शिवसेनेत गटबाजी असल्याचे उघड झाले असून मतभेद असल्याचे समोर आलं आहे. देऊळगाव राजा येथे काल एका हॉटेल मध्ये शिंदे यांच्या शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली होती.
राज्यात झालेल्या नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दमदार कामगिरी केली. पण काही ठिकाणी अजूनही पक्षामध्ये मतभेद, कुरबुरी आहेत.
चार वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं. शिवसेनेतील आमदारांचा एक मोठा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला. उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त १० ते १५ आमदार राहिले. पुढे जाऊन निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली. आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची व्याप्ती मोठी आहे. राज्यातील अनेक भागात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा विस्तार झाला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे ५७ आमदार निवडून आले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फक्त २० जागांवर समाधान मानावं लागलं.
त्यानंतर राज्यात झालेल्या नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दमदार कामगिरी केली. पण काही ठिकाणी अजूनही पक्षामध्ये मतभेद, कुरबुरी आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवनियुक्त बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख संजय सोनार यांच्या समोरच शिवसेनेच्या दोन गटात राडा झाल्याची घटना समोर आलीय. सुरूवातीला बाचाबाची वरून प्रकरण धक्काबुक्की वर गेले. यामुळे शिंदे शिवसेनेत गटबाजी असल्याचे उघड झाले असून मतभेद असल्याचे समोर आलं आहे. देऊळगाव राजा येथे काल एका हॉटेल मध्ये शिंदे यांच्या शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली होती.
आजी-माजी पदाधिकारी समोरासमोर भिडले
ही बैठक नवनियुक्त जिल्हा संपर्कप्रमुख संजय सोनार यांचे उपस्थितीत आयोजीत केली होती, या बैठकीला माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर सह पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. काही माजी पदाधिकाऱ्यांना बैठकीला निमंत्रण नसल्याने बैठक सुरू असताना त्यांनी सभागृहात प्रवेश करत घोषणाबाजी केली तसेच नवनियुक्त संपर्क प्रमुख सोनार यांचा सत्कार करण्यास आजी पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे एका गटात असंतोष पसरल्याने आजी-माजी पदाधिकारी समोरासमोर भिडले आणि शिंदे शिवसेनेत गटबाजी असल्याचे चव्हाट्यावर आले. महत्वाचे म्हणजे सेनेच्या एका गटाने माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या राजकीय कार्यप्रणालीवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने बाचाबाची झाली.