संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महापालिका ही कब्रस्थान परिसरात आहे. त्यामुळे इथं आत्म्यांचा वावर आहे, असे विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. त्याने एकच खळबळ उडाली आहे. काय म्हणाले शिरसाट?
कब्रस्तानच्या जागेवर छत्रपती संभाजीनगर महापालिकेची इमारत उभी आहे. त्यामुळे इथे आत्म्यांचा वावर आहे. या आत्म्यातून मुक्ती हवी असेल तर इमारत इतर जागी बांधावी लागेल असं धक्कादायक वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. इथले आत्मे कधी कधी तुम्हाला डिवचतात. त्यामुळे तुम्ही बैचेन होतात, असा माझा समज आहे. त्यामुळे यामधून मुक्ती हवी असेल तर ही इमारत चांगल्या ठिकाणी करा, असा सल्ला मंत्री संजय शिरसाट यांनी दिला. त्यावर आता एमआयएमने चिमटा काढला आहे.
शहरातील रस्ते मोठे होणार
36 मीटर उंचीचे मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर टेंडर सेटचा लोकार्पण सोहळा आहे. बाराव्या मजल्यावर आग लागली तरी विजवण्यासाठी मदत होणार आहे. आज मला मनापासून आनंद होतोय ज्या महानगरपालिकेत मी दहा वर्षे काम केलं त्यामुळे महानगरपालिकेच्या वैभवात भर पाडण्याचं काम मला करता आलं. स्वप्नांला पैशाची जोड असावी म्हणून मी हा प्रयत्न केला आहे. शहरातला अतिक्रमण काढलं आहे. आता रस्ते मोठे कधी होणार हे सगळे स्वप्न आता लोक पाहत आहेत. ३२ कोटी रुपये मी पोल शिफ्टिंग साठी दिले आहेत, जो ३२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातले वापरायला २३ कोटी आले आहेत बाकीचे टॅक्स मध्ये गेलं आहे. अनेक जण अनेक प्रपोजल घेऊन येतात त्यात वैयक्तिक स्वार्थ असतो हे नाकारता येत नाही. माझ्याकडे असं एक अग्निशमन गाडीच प्रपोजल आलं.कुणाला आग लावण्याची सवय असते तर कोणाला आग विझवण्याची सवय असते, आम्ही आता आग विझवणाऱ्या पैकी एक आहोत महानगरपालिका आता ठोसपणे सांगू शकेल, असे शिरसाट म्हणाले.
महानगरपालिकेत मी चांगल्या कामासाठी येत जाईल, नारळ तुम्ही फोडत जा फक्त मला थँक्स म्हणत जा. आता नक्षत्रवाडी पर्यंत पाणी आले आहे. काही लोक त्यावरही टीका करतील. नक्षत्रवाडीला पाणी आलं, लोकांना असं वाटेल एक दोन दिवसात येईल असं वाटेल, पण थोडं थांबा. आयुक्त जी. श्रीकांत याला थांबवण्यासाठी प्रयत्न करत होतो तसं काम तुमच्याकडून झालं पाहिजे. तर एमआयएमचे विरोधी पक्षनेते समीर वाजेद यांनाही मंत्री महोदयांनी यावेळी चिमटा काढला.
हा सगळा कब्रस्थानचा भाग
ही महानगरपालिकेची इमारत स्थलांतरित झाला तर बरं होईल. महानगरपालिकेला ग्रहण लागायचं कारण म्हणजे इथे सगळे मुडदे गाडत होते, हा सगळा कब्रस्तानचा भाग आहे. नवीन इमारत झाली पाहिजे आत्म्यांना सुद्धा शांती मिळेल. या गाडीसाठी आपण सोळा कोटी रुपये दिले आहेत, कोणत्याच महानगरपालिकेत आशा गाड्या पाहायला मिळणार नाही. जोपर्यंत मी पालकमंत्री आहे तोपर्यंत मी निधी देण्याचा प्रयत्न करेल. आपणा दिल बडा आहे पाठीमागे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत, वशिला लावून आपण निधी आणू, असे आश्वासन मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.





