पुणे – अल्पवयीन मूलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. एका ४७ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आंब्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने पीडित मुलीला आंबा खायला देण्याच्या बहाण्याने आपल्या खोलीत बोलावले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत.राज्यातील गुन्हेगारीच्या घटना व महिला अत्याचाराच्या घटना या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना राज्यात गेल्या काही दिवसात वाढल्या आहेत.
याउलट अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या घटनाही समोर येत आहेत. आता, पिंपरी चिंचवडमध्ये एक घटना घडली आहे. येथील काळेवाडी परिसरातील एकतानगर भागात ही घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीला आंब्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याकरणात एका ४७ वर्षीय आरोपीला काळेवाडी पोलिसांकडून अटक करण्यात आले आहे. विजय भोसले असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलीला आंबा खायला देण्याच्या बहाण्याने आपल्या खोलीत बोलावले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
अल्पवयीन मुलीला त्रास होऊ लागल्याने पालकांनी तिला तातडीने महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. आईने विश्वासात घेऊन विचारले असता, अल्पवयीन मुलीने आरोपीने घरात बोलावून अत्याचार केल्याचे सांगितले आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना कळवले आहे. काळेवाडी पोलिसांनी पोलिस पथक आरोपीच्या घरी पाठवून त्याला अटक केली आहे.
या प्रकरणात पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे काळेवाडी परिसरातील स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी, काळेवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यातील या घटनेने राज्यातील अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. या घटनेमुळे राज्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये कडक शिक्षेची तरतूद करण्याची मागणी काही पालकांकडून करण्यात आली आहे. या प्रकरणात अधिक तपास पुण्यातील काळेवाडी पोलिस करत आहेत.





