आंतरराष्ट्रीय : इराण आणि अमेरिका युद्ध थांबून मार्ग काढण्याकरिता प्रयत्न केली जात आहेत. मात्र, अजून तरी मध्यस्थी करणाऱ्या देशांना फार काही यश मिळत नाहीये. होर्मुज खाडी दिवसेंदिवस स्थिती अधिक बिकड आणि गंभीर होताना दिसत आहे.
इराण आणि अमेरिका युद्ध एका वेगळ्या स्तरावर पोहोचले आहे. होर्मुज खाडीत अमेरिकेकडून नाकेबंदी करण्यात आली. अमेरिकेने केलेल्या या नाकेबंदीमुळे इराण जैरीस आले. इराणच्या बंदरातून एकही जहाज पुढे जाऊ शकत नाहीये. काही जहाजांनी निघण्याचा प्रयत्नही केला पण अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर त्यांना परतावे लागले. यादरम्यान आता इराणकडे फक्त आणि फक्त एकच पर्याय उरला आहे. चाबहार बंदर हा एकच पर्याय इराणकडे आहे. इराणच्या मेहर वृत्तसंस्थेनुसार, अमेरिकेने सोमवारी नाकेबंदी जाहीर केली. ज्यानंतर इराणवर थेट परिणाम होताना दिसतोय. मध्य आशियासोबतच्या व्यापारासाठी वापरल्या जाणाऱ्या चाबहार बंदरात यापूर्वी भारताने कोट्यावधीची गुंतवणूक केली आहे. भारताने इराणच्या या बंदराचा पूर्ण विकास केला. आता वाईट काळात हेच बंदर इराणच्या मदतीला येताना दिसत आहे. विशेष म्हणजे होर्मुज खाडीपासून हे बंदर अत्यंत दूर आहे.
चाबहार बंदर पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील ग्वादर बंदराच्या अगदी जवळ आहे. इराणने होर्मुजच्या सामुद्रधुनीवरून संयुक्त अरब अमिरातीला मोठा धक्का दिला आहे. संयुक्त अरब अमिरातीने हा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेमार्फत सादर केला होता, जो संघटनेने स्वीकारला होता. इराणकडून स्पष्ट शब्दात सांगण्यात आले की, संयुक्त अरब अमिरातीच्या प्रस्तावाला कोणताही कायदेशीर आधार नाही.
अमेरिका आणि इस्रायलनंतर, इराणनेच संयुक्त अरब अमिरातीवर सर्वाधिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. दोन्ही देशांमधील संबंध ताणले आहेत. संयुक्त अरब अमिराती होर्मुजची खाडी खुली करण्याची आणि टोल थांबवण्याची मागणी करत आहे. मात्र, इराणकडून स्पष्टपणे त्यांची कानउघडणी करण्यात आली.
पाकिस्तानमधील इराणच्या राजदूतांनी मंगळवारी होर्मुजच्या खाडीतील नाकेबंदीविषयी बोलताना म्हटले की, एक अविचारी चूक. कदाचित सन्मानाने माघार घेण्यासाठी आणि आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी असावी. अमेरिकेसोबतच्या युद्धात इराण कोणत्याही पद्धतीने हार मानताना दिसत नाहीये. इराण इतक्या जास्त घातकप्रमाणे प्रतिउत्तर देईल, याचा विचारही कोणी केला नव्हता. दोन आठवड्यांकरिता युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. त्यापूर्वी अत्यंत मोठी धमकी इराणला अमेरिकेने दिली होती.





