तिने विश्वासाने सख्ख्या दिराकडे चावी दिली, बाहेर पडताच क्षणी जे घडलं… मुंबईत नात्याला काळिमा फासणारी घटना.

SHARE:

मुंबई : दिंडोशी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने वहिनीच्या घरात चोरी करणाऱ्या दीराला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे

आपण अनेकदा बाहेर जाताना नातेवाईक किंवा शेजाऱ्यांकडे घराची चावी देऊन जातो. ज्या नात्यावर विश्वास ठेवून घराच्या चाव्या सोपवल्या जातात, त्याच नात्याला काळिमा फासणारी घटना दिंडोशी परिसरात उघडकीस आली आहे. आपल्याच वहिनीच्या घरात डल्ला मारणाऱ्या सख्ख्या दिराला दिंडोशी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने कौटुंबिक विश्वासाला तडा गेल्याची भावना व्यक्त होत आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत या चोरीचा छडा लावत मुद्देमाल जप्त केला आहे.

नेमकी घटना काय?
दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तक्रारदार महिला काही कामासाठी घराबाहेर गेल्या होत्या. हीच संधी साधून त्यांच्या घरात चोरी झाली. जेव्हा त्या घरी परतल्या, तेव्हा कपाटातील लाखो रुपयांची रोकड आणि दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. धक्कादायक म्हणजे, घराचा मुख्य दरवाजा किंवा कडी-कोयंडा कोठेही तुटलेला नव्हता, ज्यामुळे ही चोरी डुप्लिकेट चावीच्या सहाय्याने किंवा ओळखीच्याच व्यक्तीने केल्याचा संशय पोलिसांना आला.

या घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याच्या खुणा नसल्यामुळे पोलिसांनी घरातील व्यक्तींचीच चौकशी करण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी परिसरातील रस्ते, दुकाने आणि इमारतींचे ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. तासनतास सुरू असलेल्या या तपासादरम्यान, पोलिसांना फिर्यादी महिलेचा दीर, रोमन रिझवान तानाजी, हा त्याचा मित्र अमान रसुल शेख याच्यासोबत इमारतीबाहेर संशयास्पद रित्या फिरताना दिसला.

असे फुटले बिंग
मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी रोमनला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र जेव्हा पोलिसांनी त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवले, तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने आणि त्याच्या मित्राने मिळून चैनीसाठी आणि पैशांच्या हव्यासापोटी ही चोरी केल्याचे मान्य केले.

यानंतर दिंडोशी पोलिसांनी तत्परता दाखवत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जप्त केले आहे. हे प्रकरण संवेदनशील होते कारण यात आरोपी हा घरातीलच सदस्य होता. आरोपीने वहिनीचा विश्वासघात केला. मात्र, आधुनिक तंत्रज्ञान आणि सीसीटीव्ही नेटवर्कमुळे आमचे पथक आरोपींपर्यंत वेगाने पोहोचू शकले. आम्ही आरोपींकडून सर्व मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी दिली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा

एका हिंदू मुलीने नाशिकमध्ये वास करताना मुंबईतील कॉर्पोरेट जिहादच्या घटनेचा उल्लेख केला आहे. त्याच्या संदेशात अश्लीलता आहे. त्याच्यावर काही केलं त्याला नाशिकनंतर मुंबईत कॉर्पोरेट जिहादची जबाबदारी वाहावी लागली आहे.