भोंदूबाबा मनोहर भोसलेचा २७ एकरावरील आश्रम बंद करा; पोलीस अधीक्षकांना पत्र लिहीत ग्रामस्थ आक्रमक

SHARE:

सोलापूर – भोंदूबाबाचा २७ एकरावरील आश्रम बंद करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना पत्र देण्यात आले आहे. सोलापूरातील भांदूबाबा मनोहर भोसलेचा आश्रम बंद करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील घोटी येथील भोंदूबाबा मनोहर भोसले याला फसवणूक आणि जादूटोणा प्रकरणात अटक केली आहे. त्याचा आश्रम बंद करावा, अशी मागणी घोटी गावचे सरपंच विलासकाका राऊत यांनीही आश्रमाची चौकशी करून तो बंद करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणामुळे करमाळा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. भोंदूबाबा मनोहर भोसलेच्या घोटी येथील आश्रमात दर अमावस्या आणि पौर्णिमेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे माहिती मिळाली आहे. बाहेरील राज्यांतील लोकही येथे वास्तव्यास असल्याची माहिती देत ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला आहे. भोंदूबाबा मनोहर भोसले लोकांना ज्योतिष सांगण्याच्या नावाखाली जादूटोणा करत असल्याचा आरोप आहे. यामुळे अनेकांची फसवणूक झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणात भोंदूबाबा मनोहर भोसले याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. न्यायालयाने भोंदूबाबा मनोहर भोसलेला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. करमाळा तालूक्यातील घोटी गावातील कोणताही ग्रामस्थ भोंदूबाबा मनोहर भोसले यांच्याकडे जात नसून त्यांच्या संपर्कातही नाही असे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता भोंदूबाबा मनोहर भोसलेचा घोटी येथील २७ एकरावरील असणारा आश्रम बंद करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

२०२१ मध्ये करमाळा-इंदापूर सीमेवरील मांजरगाव येथे असलेला भोंदूबाबा मनोहर भोसलेचा आश्रम गुन्हा दाखल झाल्यानंतर बंद करण्यात आला होता. त्यावेळीही स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आता घोटी येथील २७ एकरावर पसरलेल्या आलिशान आश्रमाबाबत सोलापूर पोलीसांनी कडक कारवाई करण्याची मागणी घोटी येथील नागरिकांनी केली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा