मुंबई – “मी पुन्हा पुन्हा सांगतो तिथल्या काही लोकांनी चूक केली म्हणून संपूर्ण कंपनीला दोषी धरण चुकीचं आहे. कंपनी जर बदनाम केली तर कोणती कंपनी पुन्हा नाशिक मध्ये येणार नाही. लाखो लोक जगभरामध्ये या कंपनीत काम करत आहेत. कुठे काय चालतं हे आपल्याला समजते”
“मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सांगितले आहे, ज्यांना मराठी येत नाही, त्यांना आपण मराठी शिकवू. मुंबईमधील रिक्षा आणि टॅक्सी या बहुतांश मराठी न बोलणाऱ्या लोकांच्या ताब्यात आहे. मात्र संप करणार तर पुन्हा गोंधळ निर्माण होणार. त्यापेक्षा आठवड्यातून एकदा मराठी शिकवण्याचे वर्ग घेतले गेले पाहिजेत. ज्यांनी मराठी शिकली आहे, त्यांना एक छोटसं सर्टिफिकेट द्यावे. एकदमच आपण सर्व बंद करायला गेलो तर तुम्हाला माहिती नाही नवीन प्रश्न निर्माण होईल” असं मंत्री छगन भुजबळ मराठी सक्तीच्या विषयावर बोलले. आता एका नव्या भोंदू मनोहर भोसलेची चर्चा आहे. त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, “हा कोण मनोहर भोसले, हे मला अजून माहिती नाही. भोंदू लोकांना लोक पैसे खूप देतात. अधिकारी देखील मदत करतात आणि आमच्यासारखे आमदार देखील मदत करतात. त्यामुळे बाबांचा धंदा जोरात सुरू होतो”
बच्चू कडू यांच्या राजकीय पुनर्वसनाबद्दल म्हणाले की, “चांगली गोष्ट आहे. सगळ्यांच राजकीय पुनर्वसन झालं पाहिजे आणि महाराष्ट्राची सेवा त्यांच्या हातातून योग्य पद्धतीने घडली पाहिजे” “मी पुन्हा पुन्हा सांगतो तिथल्या काही लोकांनी चूक केली म्हणून संपूर्ण कंपनीला दोषी धरण चुकीचं आहे. कंपनी जर बदनाम केली तर कोणती कंपनी पुन्हा नाशिक मध्ये येणार नाही. लाखो लोक जगभरामध्ये या कंपनीत काम करत आहेत. कुठे काय चालतं हे आपल्याला समजते” असं मंत्री छगन भुजबळ टीसीएस प्रकरणावर म्हणाले.
इराण-अमेरिका युद्धाचा देखील हवामानावर काही परिणाम
“झाडं तोड करू नका. वेगवेगळ्या विकास कामांसाठी एक दोन नाही तर ४ ते ५ हजार झाड तोडली जातात. इराण आणि अमेरिका युद्धाचा देखील हवामानावर काही परिणाम होतच असेल. मानव जातीने जर निसर्गाकडे पूर्ण लक्ष दिलं नाही, तर त्याचे परिणाम हळूहळू आपल्याला भोगावे लागतील” असं ग्लोबल वार्मिंग आणि तापमान ४५ डिग्रीवर गेलय त्यावर छगन भुजबळ म्हणाले.
ते कधी म्हणालेत का ? आम्ही थकलोय
कथाकार धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्या धीरेंद्र शास्त्रींचा छगन भुजबळ यांनी समाचार घेतला. “छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांची भेट झाली नाही असे अनेक इतिहासकार म्हणतात. तुम्ही इतिहासकार नाही, तुम्ही पुरणातील कथा सांगून भजन कीर्तन करता. इतिहासकार हे वेगळे असतात ते शेवटपर्यंत जातात काय इतिहास झाला ते शोधून काढतात. अशी कुठलीही गोष्ट आणि पुरावासमोर आला नाही की संत रामदास व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली आहे किंबहुना याचा विरोध करण्यात आलेला आहे” असं छगन भुजबळ म्हणाले.
“जे इतिहासात नाही ते तुम्ही सांगायला लागले. छत्रपती शिवाजी महाराज थकले असे सांगाल तर याचा राग मराठी माणसासह छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला येईल. छत्रपती शिवाजी महाराज काय.. संभाजी महाराज काय.. यांनी प्राणाची आहुती दिली. ते कधी म्हणाले नाही मी थकलोय. महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे युगपुरुष आहेत ते कधी म्हणालेत का ? आम्ही थकलोय जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते लढले” अशा शब्दात छगन भुजबळ यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.






