मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) सोशल मीडिया राज्य प्रमुख महादेव बाळगुडे यांना आक्षेपार्ह पोस्ट आणि नक्षलवाद्यांच्या विचारसरणीचे समर्थन केल्याच्या आरोपात पिंपरी-चिंचवडच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना ३ ते २० एप्रिल या दरम्यान ऑनलाइन घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव बालगुडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो मॉर्फ करून आक्षेपार्ह स्वरूपात सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांनी नक्षलवादी नेता हिडमा याचे उदात्तीकरण करणारी सामग्रीही शेअर केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पुण्यातील वकील ॲड. बसवराज मल्लिकार्जुन यादवाड यांनी २२ एप्रिल रोजी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गुन्हा नोंदवत महादेव बालगुडे यांना २४ एप्रिल रोजी अटक केली.
बालगुडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो मॉर्फ करून तो आक्षेपार्ह स्वरूपात सोशल मीडियावर प्रसारित केला तसेच त्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करून चिथावणी देऊन सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने हिंसा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे.
या संदर्भात पुण्यातील वकील ॲड. बसवराज मल्लिकार्जुन यादवाड यांनी पिंपरी चिंचवड शहर सायबर पोलिसांकडे ११ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि बालगुडे यांना २४ एप्रिल रोजी अटक केली आहे.
बालगुडे यांच्याविरोधात वकिलांनी केलेल्या तक्रारीत मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन करणे आणि देशविघातक शक्तींचे समर्थन करणे अशा मुद्द्यांवर भर देण्यात आला. बालगुडे यांच्या अटकेनंतर पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातील राजकीय वातावरण तापले आहे.या प्रकरणाचा अधिक तपास आता पिंपरी चिंचवड शहर सायबर पोलीस करत आहेत.






