काळजाचा थरकाप! बिहारमध्ये प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, २ जणांचा मृत्यू तर ५ बेपत्ता

SHARE:

बिहार – राज्यामध्ये प्रवाशांनी भरलेली बोट नदीपात्रात उलटून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. 5 प्रवासी अद्यापही बेपत्ता आहेत. बिहार राज्यामध्ये 14 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली आहे. बिहार राज्याच्या बरह उपविभागात ही घटना घडली आहे. पहाटेच्या वेळी ही प्रवाशांनी भरलेली बोट नदीच्या पात्रात उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. 5 प्रवासी अद्यापही बेपत्ता आहेत. या घटनेत स्थानिक मच्छीमार आणि बचाव पथकाच्या सतर्कतेमुळे 7 जणांना नदीच्या पुरातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

या घटनेमुळे संपूर्ण बरह परिसरात आणि मृतकांच्या नातेवाईकांनी हळहळ व्यक्त केली आहे. नदीच्या मध्यभागी गेल्यावर अचानक बोटीने तोल गेला आहे. स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 14 प्रवाशांना घेऊन ही बोट दियारा क्षेत्राच्या दिशेने जात होती. बोट घाटावरून काही अंतरावर गेली आणि गंगा नदीच्या मुख्य पात्रात पोहोचली. गंगा नदीच्या पात्रात अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने किंवा अन्य कारणांमुळे बोटीचा तोल गेला. काही समजण्याच्या आतच प्रवाशांनी भरलेली बोट गंगा नदीत उलटली आहे.

बोट उलटताच पाण्यात पडलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी ओरडले आहेत. हा आरडाओरड ऐकून घाटावर उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी आणि नाविकांनी कोणतीही पर्वा न करता नदीत उड्या मारल्या आणि 7 जणांचे प्राण वाचवले आहेत. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण पाटणा प्रशासनात खळबळ उडाली आहे.विभागाच्या उपविभागीय अधिकारी गरिमा लोहिया आणि एसडीपीओ रामकृष्ण यांनी आपल्या फौजफाट्यासह धाव घेतली आहे.

बिहार राज्यातील प्रशासनाने तातडीने एनडीआरएफ आणि स्थानिक गोताखोरांच्या बोट पथकाला पाचारण केले आहे. सध्या गंगा नदीच्या वेगवान प्रवाहात बेपत्ता असलेल्या 5 जणांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन राबवले जात आहे. नदीच्या वेगवेगळ्या भागांत बोटींच्या साहाय्याने शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. या अपघाताचे घ्माहिती मिळाल्यावर घाटावर स्थानिक लोकांची आणि पीडितांच्या नातेवाईकांची प्रचंड गर्दी जमली आहे. पोलीस सध्या मृत घोषित केलेल्या 2 जणांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.

तर वाचवलेल्या जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे बिहार राज्यातील पाण्यातील प्रवाशी वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीत बसवले गेले होते का? प्रवाशांकडे लाईफ जॅकेटसारखी सुरक्षेची साधने उपलब्ध होती का? या सर्व बाजूंची प्रशासनाकडून कसून चौकशी केली जात आहे. तर या घटनेतील दोषींवर बिहार प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment