मागण्या मान्य करा, अन्यथा उपोषण मागे घेणार नाही; मराठा बांधवांच्या अंगावर हात पडल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील: मनोज जरांगे यांचा इशारा

SHARE:

आंतरवाली सराटी – सरकारने मागण्या मान्य कराव्या अन्यथा उपोषण मागे घेणार नाही, व मराठा बांधवांवर हल्ला झाला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगे हे निर्णयावर ठाम आहे. सरकारला शेवटचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षण न लागू केल्याने मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. 10 महिने मुदत देऊनही सरकारने तोडगा काढला नाही, सर्व बैठका निष्फळ ठरल्या आहेत मागण्या मान्य नसतील तर उपोषण थांबवणार नाहीअसे मनोज जरांगे म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. सरकारला एक नाही तर 10 महिने मुदत दिली होती, तरीसुद्धा सरकारने मराठा आरक्षण लागू केले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण युरू केले आहे. सरकारने मागण्या मान्य कराव्यात, मी मागे हटणार नाही. राज्यातील मराठा बांधवांवर हल्ला झाला तर त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. भर उन्हामध्ये पायात चप्पल नाही, अन्न आणि पाणी न घेता मनोज जरांगे पाटील आता आंतरवाली सराटीत एका शेतात उपोषणाला रणरणत्या उन्हात बसले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी कऱण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ आले होते. मात्र बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंतरवाली सराटी इथे एका शेतात बाज टाकून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्यासोबत काही मराठा आरक्षण आंदोलक देखील उपोषणाला बसले आहेत. डोक्यावर कोणत्याही प्रकारचे छत नाही. मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार आहे, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.

मंत्री विखे पाटील यांनी सांगितले आहे की,जरांगेंच्या मागणीनुसार आम्ही ड्राफ्ट तयार केला आहे, त्यामध्ये अजून काही बदल असतील ते पूर्ण करणार आहे. जरांगेंना ड्राफ्ट व्यवस्थित वाटेल, आम्ही आशावादी आहोत असे विखे पाटील अंतरवाली सराटीत जाऊन आज पुन्हा जरांगेंची भेट घेणार आहेत. जरांगेंनी उपोषण करू नये अशी विनंती ते पुन्हा त्यांना करणार आहेत.

मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू झाल्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी उपोषणावर ठाम आहे. राज्यात सरकारे येत राहतील, सरकारे जात राहतील. मी उपोषणावर ठाम आहे. मराठ्यांच्या नशिबात आव्हाने आहेत. सातारा संस्थानच सरकारने लवकर जीआर काढावा. सरकारने न्याय देण्याच्या भूमिकेत यावे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.

Leave a Comment